Home सामाजिक भद्रावतीत युवासेनेचे रणशिंग

भद्रावतीत युवासेनेचे रणशिंग

10

आगामी निवडणुकांसाठी ‘BLA’ नेमणुकीवर भर

हर्षल शिंदे यांचे कार्यकर्त्यांना प्रभावी मार्गदर्शन

प्रत्येक बूथ मजबूत करण्याचा निर्धार

भद्रावती : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२६ रोजी हॉटेल सन्नी पॉईंट येथे युवासेनेच्या वतीने एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्यासाठी ‘BLA’ (Booth Level Agent) नेमणुकीचा निर्धार यावेळी करण्यात आला.

.       या बैठकीला युवासेना चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख हर्षल शिंदे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. “निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रत्येक बूथ मजबूत असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी BLA ही सर्वात निर्णायक भूमिका बजावणार आहेत,” असे प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केले. तसेच संघटना अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

.       युवासेना जिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांनी स्थानिक पातळीवर संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांना ठोस दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित युवासैनिकांमध्ये एक नवे चैतन्य निर्माण झाले. या बैठकीत BLA नेमणुकीच्या प्रक्रियेवर सखोल चर्चा करण्यात आली असून पुढील रणनीतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

.        याप्रसंगी युवासेना जिल्हा संघटक सुमित हस्तक, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुनेश्वर बदखल, शहर प्रमुख राज चव्हाण, तालुका प्रमुख महेंद्र भोयर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते. या बैठकीतून युवासेनेने भद्रावती परिसरात आपल्या संघटनात्मक शक्तीचे प्रदर्शन घडवले आहे.

error: Content is protected !!