आसाळा येथे स्वच्छ कापूस वेचणी प्रशिक्षण संपन्न

49

टेमुर्डा

.          तालुका कृषी अधिकारी, वरोरा च्या वतीने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट अंतर्गत निवडण्यात आलेल्या आसाळा गावांत १ नोव्हेंबर ला सायंकाळी ७ वाजता स्वच्छ कापूस वेचणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

.          सदर प्रशिक्षणास प्रमुख मार्गदर्शक विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी, शेगांव बु. यांनी स्वच्छ कापूस वेचणी व साठवणूक करताना घ्यावयाच्या दक्षता, सरळ कापूस विक्री व प्रक्रिया करून रुई व सरकी विक्री यामधील १०० किलो करिता येणारा ताळेबंद व नफा याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले.

.          स्मार्ट प्रकल्पात पूर्ण महाराष्ट्रात पहिल्याच प्रयत्नात ३०० गाठी बनवून यशाचे शिखर गाठणारे वरोरा तालुक्यातील यशस्वी प्रगतशील शेतकरी भानुदास बोधाने यांनी कापसापासून गाठी बनवून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करीत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्याकरिता केलेल्या उपाययोजना याबाबतचे स्वतःचे अनुभव सांगितले.व गाठी विक्रीचे फायदे, साठवणूक तसेच स्मार्ट कॉटन मार्केटिंग बाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले. पी.एस.आडकीने, कृषी पर्यवेक्षक शेगांव बु यांनी रब्बी हंगामातील हरभरा लागवड तंत्रज्ञान ,जवस लागवड तंत्रज्ञान व कृषी विभागाच्या विविध योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

.          सदर प्रशिक्षणाला स्मार्ट कॉटन प्रकल्पात भाग घेणारा आसाळा येथील संघर्ष शेतकरी गट चे अध्यक्ष राजु आसुटकर, उपाध्यक्ष जितेंद्र गाढवे, सचिव शालीक डुकरे, गट प्रवर्तक धरमदास डुकरे, प्रयोगशील शेतकरी किशोर डुकरे, पोलिस पाटील ढोक व गावातील शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

.          प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कृषी सहाय्यक रोशन डोळस यांनी प्रभावीपणे केले.