विसापुरातील तरुणाचा आंध्रप्रदेशात अपघाती मृत्यू

36

चंद्रपूर 

.           बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील चार ते पाच तरुण कामासाठी आंध्रप्रदेश राज्यातील मच्छलीपतनम जिल्ह्यात कोलाचीपा गावात गेले होते.तेथे कामावर मत्सयांना खाद्य टाकताना तो कृत्रिम तलावात पडला. यात त्याचा अपघाती मृत्यू झाला.ही घटना 31 ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान आंध्रप्रदेश राज्यात घडली.त्याचा पार्थिवदेह गुरुवार ( दि. २ ) नोव्हेंबर रोजी विसापुरात आणण्यात आले. येथील स्म्शानभूमीवर अत्यन्त शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रामू छत्रपती टोंगे ( वय २२ ) रा.विसापूर जि. चंद्रपूर असे आहे.त्याच्या मागे वडील व भाऊ आहे.

.           मृतक रामू टोंगे हा विसापूर ता.बल्लारपूर येथील मित्रांसोबत कामाच्या शोधार्थ आंध्रप्रदेश राज्यातील मच्छलीपतनम जिल्ह्यातील बांदर तालुक्यातील कोलाचीपा गावात गेला होता. आठ ते दहा दिवसानंतर त्याला व सोबतच्या मित्रांना एका मत्स्य व्यवसाय करणाऱ्याकडे मत्स्यांना खाद्य टाकण्याचे काम मिळाले.अर्ध्या एकर परिसरात कृत्रिम तलावात मत्स्यांना खाद्य टाकताना रामूचा तोल गेला.यात त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला.या घटनेची माहिती त्याचा मित्र अनिल कोरेवार याने त्याचे वडील छत्रपती टोंगे यांना दिली.मुलाच्या मृत्यूने वडिलांचे अवसान गळाले.तब्बल दोन दिवसानंतर गुरुवारी पहाटे ४ वाजता रामूचा मृतदेह विसापूर येथे आणण्यात आले. यावेळी कुटूंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
रामू टोंगे यांच्या आईने वर्षभरापूर्वी जीवन यात्रा संपवली होती.तोच कुटुंबाचा आधार होता.त्याच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गावाजवळील उद्योग बंद झाल्याने बेरोजगारांची भटकंती                                                                                                                                                                                                                                                   एके काळी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाजवळ विज केंद्र,चुनाभट्टी व प्लायवुड कंपनीच्या माध्यमातून गावातील तरुणांना व कामगारांना रोजगार मिळत होता.आजूबाजूच्या गावातील लोक रोजगारांसाठी गावात आले.येथेच स्थायिक झाले. गावात शेती व्यवसाय देखील जेमतेम आहे.केवळ बल्लारपूर पेपर मिल सुरु आहे. या उद्योगात देखील खूप कमी कामगार कार्यरतआहे.मात्र चुनाभट्टी,प्ल्यावु ड कंपनी व विज केंद्र मागील कित्येक वर्षांपासून बंद पडल्यामुळे परिसरात रोजगारांची वानवा निर्माण झाली आहे. परिणामी येथील बेरोजगार तरुणांना व कामगारांना पर राज्यात कामाच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. यातून रामू टोंगे सारख्या तरुणाला कामाच्या शोधार्थ कोसोदूर जावे लागले.यातच त्याचा ह्रदयदायक अपघाती मृत्यू झाला.