विसापुरात देवी विसर्जन दरम्यान कृषी संस्कृतिचे दर्शन

38

न्यू बाल शारदा मंडळाने सादर केला देखावा

पाच बैलगाडीच्या माध्यमातून निघाली मिरवणूक

चंद्रपूर

.              बल्लारपूर तालुक्यातील विसापूर मध्ये यावर्षी नवरात्री उत्सव दरम्यान तब्बल बत्तीस सार्वजनिक मंडळाने सार्वजनिक दुर्गा व शारदा देवी मंडळाने मुर्त्यांची प्रतिष्ठापना केली.नऊ दिवस विविध कार्यक्रम व बालकांसाठी स्पर्धाचे आयोजन करून मंगलमय वातावरणात नवरात्री उत्सव साजरा केला.बुधवारी काही मंडळाने देवींची मिरवणूक काढून विसर्जन केले.यामध्ये विसापूर येथील वार्ड एक मधील न्यू बाल शारदा मंडळाने अनोखा देखावा सादर करून पारणें फेडले.चक्क पाच बैलगाडीच्या माध्यमातून मिरवणूक काढली.यामुळे देवी विसर्जन दरम्यान गावाकऱ्यांना कृषी व शेतकरी संस्कृतिचे दर्शन घडले.

.              बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव आहे. गावात महिला मंडळाच्या उत्स्फूर्त सहभागाने गावात नवरात्रौ उत्सव मंगलमय वातावरणात व भक्ती भावाने साजरा केला. विजयादशमी नंतर बुधवारी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मुर्त्यांची काही मंडळाने पौराणिक वैभवाचे दर्शन घडवित देखावे सादर केले.त्या सोबतच आधुनिक संस्कृतिचे देखील दर्शन घडवले. येथील वार्ड एक मधील न्यू बाल शारदा मंडळाच्या महिला व तरुण कार्यकर्त्यांनी शारदा देवीचे विसर्जन चक्क पाच बैलगाडाच्या माध्यमातून केले.वाजतगाजत व कृषी संस्कृतिचे दर्शन घडविणारी मिरवणूक लोकांना चांगलीच भावली.अनेकांनी या मिरवणुकीचे चित्रण करून समाज माध्यमावर प्रसारित केले.शेतकरी व कृषी संस्कृतीची जोड देत,कार्यकर्त्यांनी पौराणिक देखावे सादर केले.