अंधश्रध्दाचे निमुर्लन झाले पाहिजे – डॉ. अंकुश आगलावे

36

वरोरा 

.             समाजातुन अंधश्रध्दाचे निमुर्लन झाले पाहिजे असल्याचे प्रतिपादन गुरूदेव प्रचारक डॉ. अंकुश आगलावे यांनी आनंदवन चौक येथे छावा ग्रुपव्दारे आयोजित गरबा व दांडिया उत्सवाप्रसंगी केले.

.             डॉ. आगलावे पुढे म्हणाले की शेतकरी शेतात कबाड कष्ट करून उत्पन्न मिळवितो हीच खरी लक्ष्मी आहे. समाजात आताही अनेक रूढी परंपरा आहे जी अंधश्रध्दाचे ग्रासलेले आहे. खरी विद्या तर पुस्तके वाचल्याने मिळते. डॉ. आगलावे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अंधश्रध्दा व जातीभेद निर्मुलनासाठी भजन व किर्तनाचा वापर केला.
छत्रपती शिवाजी महाराजानी अनेक लढाई अमावस्याचे रात्री करून शत्रुंवर विजय मिळविला परंतु आताही माता भगिनी अमावस्याला बाहेर निघु नये भुत पिशाच्च असते अशी बतावणी करतात ही केवळ अंधश्रध्दा असल्याचे डॉ. आगलावे यांनी सांगितले.

.             कार्यक्रमाचे आयोजन छावा गु्रपच्या वतीने करण्यात आला. यावेळी छावा ग्रुपचे अध्यक्ष आकाश लीगाडे, उपाध्यक्ष निहाल मत्ते, सचिव समीर देठे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत स्कुल बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी छावा ग्रुपचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते तसेच या गरबा दांडिया उत्सवात अनेक युवक युवतीने सहभाग घेतला.