शिवसेना (उबाठा) मदतीने शेतकऱ्यांना मिळाले विद्युत ट्रान्सफॉर्मर

58

शेतकऱ्यांनी जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांचे मानले आभार

वरोरा 

.            तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत ट्रान्सफॉर्मर खराब झाले होते. महावितरण कार्यालयात ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नसल्याने शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. मात्र शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना विद्युत उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

.           तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विदयुत ट्रान्सफर खराब झाल्याने त्यांनी खांबाडा येथील महावितरण कार्यालय येथे धाव घेतली होती. त्याठिकाणी ट्रान्सफर उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्याशी शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे यांच्या सहकार्याने संपर्क साधला. जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी तत्काळ महावितरणचे मुख्यअभियंता यांच्याशी संपर्क साधुन शेतकऱ्यांच्या शेतात ट्रान्सफर उपलब्ध करून द्या अशी मागणी केली होती. याचीच दाखल घेऊन महावितरण अधिकाऱ्यांनी चंद्रपूर वरून विदयुत ट्रान्स्फरची मागणी करून 100 व्हॅट चे विद्युत ट्रान्सफर बोडखा मोकाशी येथील शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आले. त्यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्य रुपेश तुराळे, राजेंद्र तुराळे, देविदास हुलके, विठ्ठल बरडे, केशव बलखंडे, पुणेश्वर तुराळे, सचिन चिडे,संजय सराटे,महादेव तुराळे, तुळशीराम तुराळे व शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांचे आभार व्यक्त केले.

.           सध्या शेतीचे हंगाम असल्याने शेतकरी शेतात ओलीत करतात त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान न व्हावे यासाठी वरोरा येथील महावितरण कार्यालयात तात्काळ विदयुत ट्रान्सफर जास्तीत जास्त उपलब्ध करून ठेवावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी विद्युत वितरन कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली आहे.