नंदोरीच्या माजी उपसरपंचांनी स्वखर्चातून निर्माण केला पांदन रस्ता

61

भद्रावती

.         शेतात जाण्यासाठी पांदन रस्ते आहेत मात्र अनेक रस्ते खड्डेमय झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. अशातच स्वतः शेतकरी असलेल्या नदोरी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्यांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून स्व खर्चातून शेतकऱ्यांना पांदन रस्ता निर्माण करून दिल्याने शेतकऱ्यात आनंद व्यक्त होत आहे.

.         भद्रावती तालुक्यातील नंदोरी ते टाकळी येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदन रस्ता आहे मात्र हा पांदन रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असुन ठिकठिकाणी झाडें झुडपे वाढल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कसरत करावी लागत होती. याबाबत काही शेतकऱ्यांनी शिवसेना विधानसभा संघटक, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य मंगेश भोयर यांना पांदन रस्त्याची अडचण सांगितली याबाबत तात्काळ निर्णय घेत स्वखर्चातून जेसीबी च्या साहाय्याने नंदोरी ते टाकळी या हतीन पांदन रस्त्याचे काम पुर्ण करून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. त्यांचा या कामगिरीने शेतकऱ्यात आनंद व्यक्त होत आहे.