दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या स्वप्न पूर्तीसाठी प्रतिभाताईसोबत राहा

46

 माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे आवाहन 

भाऊचा दांडियासाठी पुगलिया कुटुंबियांकडून दीड लाखांची बक्षिसे 

चंद्रपूर 

.         “दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जाण्याने एक सहकारी मी गमावला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत राहण्याचे आवाहन खासदार नरेशबाबू पुगलीया यांनी केले. चंद्रपूर शहरातील भाऊचा दांडिया उत्सवाचे उद्धघाटन माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया सपत्नीक आले होते. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत मागील वर्षी भाऊचा दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यांच्या जाण्याने या उत्सवाचं आयोजन करण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर आली.

.         यावेळी त्यांनी पुगलिया कुटुंबियांकडून दांडियातील स्पर्धकांकरिता दीड लाखांची बक्षिसे जाहीर केली. ग्रुप दांडियामध्ये नगरपरिषद चंद्रपूर निर्वाचित प्रथम अध्यक्ष स्व. राजमलजी पुगलिया यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ राजमलजी पुगलिया फाउंडेशन, चंद्रपूर तर्फे एक लाख चे प्रथम पुरस्कार व कपल डॉन्स मध्ये ज्या ग्रुपचा प्रथम क्रमांक येईल त्या कपल गृपला स्वतंत्र सेनानी स्व. उत्तमचंद राजमलजी पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५० हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

.         याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या कि, दिवंगत बाळू धानोरकर यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांची क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात आवड होती. तो वसा पुढे नेण्याकरिता मी पुढे देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

.         यावेळी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, भद्रावती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, काँग्रेस नेते गजानन गावंडे, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, इंटक नेते के. के. सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, माजी महापौर संगीता अमृतकर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे, अनुसूचित जाती महिला नेत्या अश्विनी खोब्रागडे, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल शेख रजा, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती शहर अध्यक्ष सुरज गावंडे, वरोरा तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, माजी नगरसेवक अशोक नागापुरे, माजी नगरसेवक देवेंद्र बेले, यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष वंदना आवारी, वसंत जिनींग संचालिका साधना गोहोकार, शारदा ठाकरे, संध्या गोहोकर, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, भालचंद्र दानव, रतन शिलावार, नरेंद्र बोबडे, डॉ. सागर वझे, उमाकांत धांडे, सुरजकुमार बोबडे, मोनू चिमुरकर, सचिन घाटे, प्रमोद मगरे, बसंत सिंग, बाळू चिंचोलकर, सुनंदा धोबे, मीनाक्षी गुजरकर, शालिनी भगत, सौरभ ठोंबरे, मोनू रामटेके यांची उपस्थिती होती.

.         ‘भाऊचा दांडिया’ उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. चांदा क्लब ग्राउंडवर २४ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता दांडियाची घूम राहणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल स्ट्रट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने करण्यात आले आहे.