प्रस्ताव अंतिम टप्प्यात… दीक्षाभूमीचा विकास होणारच – आ.जोरगेवार

37

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने पवित्र दिक्षाभुमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे आयोजन

चंद्रपूर 

.           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पावलाने पवित्र झालेल्या दिक्षाभूमीच्या सर्वसमावेशक विकासासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. पहिल्याच अधिवेशनात आपण येथील विकासकामांसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. या दरम्यान सरकार बदलली मात्र आपली मागणी बदललेली नाही. येथील विकासासाठी 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो अंतिम टप्प्यात असून चंद्रपूर येथील दिक्षाभूमीचा विकास होणारच असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

.           डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने पवित्र दिक्षाभूमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, वामनराव मोडक, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ अनिल हिरेकर, डॉ. बोकारे आदींची उपस्थिती होती.

.           यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, नॉलेज ऑफ सिम्बॉल समजल्या जाणा- महामहिम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या दिक्षाभुमीचा अपेक्षित असा विकास झाला नाही. मात्र ही परिस्थिती बदलवायची आहे. आपण या दिक्षाभूमीचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. येथील अभ्यासिकेसाठी आपण 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यातून अभ्यासिकेचे कामही सुरू आहे. येथे आणखी निधी देण्याची मागणी आता आली आहे. आपली ही मागणीही मान्य आहे. पुन्हा एक कोटी रुपये येथे देत असल्याची घोषणाही यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.

.           ते म्हणाले कि, निवडून आल्या नंतर आपण पहिल्याच अधिवेशनात चंद्रपूरच्या दिक्षाभुमीच्या विकासासाठी एकत्रित 100 कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर मागणी मान्य करत निधी देण्याची घोषणाही केली आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक अधिकारामुळेच टोपल्या विकणा-या आईचा मुलगा राज्याच्या सर्वोत्तम सभागृहात पोहचू शकला त्यामुळे आज मिळालेला वाटपाचा अधिकार योग्य त्या ठिकाणी वारण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले.