लोकमान्य कन्या विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

39

वरोरा

.        येथील लोकमान्य कन्या विद्यालयात हॅपी क्लास प्रकल्प अंतर्गत डॉ. ऐ पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला गेला.

.        या प्रसंगी विद्यार्थिनींनी उपलब्ध करून दिलेल्या मासिकांचे मूक वाचन करून वाचू आनंदे उपक्रमाचा श्रीगणेशा केला. या उपक्रमा अंतर्गत इच्छुक विद्यार्थिनींना घरी वाचण्यासाठी दर आठवड्याला एक पुस्तक अथवा मासिक उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कार्यक्रमाला लोकमान्य विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राहुल राखे अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला व वाचन प्रेरणा दिनाचे महत्व विषद केले. विद्यार्थिनींनी वाचनाची आवड जोपासावी या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात एकवीस विद्यार्थिनींचा सहभाग होता. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता धोपटे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रकल्प प्रमुख राघवेंद्र अडोणी यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. पंकज गहुकर यांचे या उपक्रमात सहकार्य लाभले.