महाआरोग्य शिबिराचा 1291 रुग्णांनी घेतला लाभ

44

गडचांदूर

.           आ. सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर, आ. सुभाष धोटे मित्रपरिवार व दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी ( मेघे ) यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे महाआरोग्य शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात १२९१ रुग्णांच्या आरोग्याची तपासणी केली. काही रुग्णांना पुढील उपचाराकरिता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथे पाठविण्यात येणार आहे. १२० रुग्णांनी कौटुंबिक आरोग्य कार्ड काढले. या कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांना वर्षभरात मोफत तपासण्या करता येईल.

.           शिबिराचे उद्घाटन आ.सुभाष धोटे यांनी केले. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम पेचे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, नगराध्यक्ष सविता टेकाम, सीडीसीसी बँकचे संचालक विजयराव बावणे, कृ. उ. बा. स. सभापती अशोक बावणे, कोरपना च्या नगराध्यक्ष नंदा बावणे, डॉ. मिखिलेश, प्राचार्य स्मिता चिताडे, संस्थेचे सचिव धनंजय गोरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, प्राचार्य डॉ. देव, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा आशा खासरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशिष देरकर, प्रास्ताविक सचिन भोयर यांनी केले.

.           यावेळी ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट व्यंकटेश बालसनीवार, रउफ खान वजीर खान, गुलाबराव शेंन्द्रे, संजय रणदिवे, दिगांबर लांजेकर, अजय लांजेकर यांचे कडून वाटप करण्यात आले.