आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
महाविद्यालय तसेच विविध विकासकामांबाबत मंत्रालयात बैठक
आ. मुनगंटीवारांच्या सूचनेनंतर १०० घरे तातडीने देण्याचा निर्णय
चंद्रपूर : नवीन चंद्रपूर (म्हाडा कॉलनी) परिसरात गरिबांसाठी 10 हजार घरे बांधण्याच्या कार्यक्रमाबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांना पत्र लिहून संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक पार पडली.
. या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे अतिक्रमणधारकांना म्हाडामध्ये घरे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात बैठकीत मुद्दा लावून धरला. यासोबतच पुनर्वसनासंदर्भात पाच वर्षांचे वेळापत्रक निश्चित करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी केल्या. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी रेल्वे अतिक्रमणधारकांना १०० घरे देण्याचे बैठकीत आश्वासीत केले.
. विशेष म्हणजे यासंदर्भातील पुढील बैठक केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे होईल, असेही आ. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
. म्हाडा कॉलनी परिसरात शिक्षणाच्या अधिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय प्रस्तावित आहे. या प्रस्तावानुसार परिसरात क्रीडांगण, भूमिगत नाले आणि रस्ते विकासाची कामे जलदगतीने करण्याची आवश्यकता असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांबाबत विभाग सकारात्मक असल्याचे मंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
. बैठकीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.