वाढत्या उष्णतेच्या पाऱ्यामुळे अंगाची लाहीलाही
सामाजिक कार्यकर्ता अतुल वानखेडे यांची निवेदनाद्वारे न.प. प्रशासनाला मागणी
वरोरा : सूर्य आग ओकू लागला. दरवर्षीपेक्षा या वर्षाला उष्णतेने अधिक उच्चांक गाठला. लोक शीतपेय पिऊन शरीराला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहे.शहरी व ग्रामीण भागातील लोकांची बाजारपेठेत वर्दळ असते. उन्हात वस्तूंची खरेदी आटोपल्यानंतर उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली बसून विसावा घेण्याकरिता गांधी उद्यानाशिवाय असे कोणतेही ठिकाण नाही.त्यामुळे लोकांसाठी विसावा व विश्रांती घेण्यासाठी दिवसभर खुले ठेवावे अशी मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्ता अतुल वानखेडे यांनी सामाजिक भान जोपासत नगरपरिषद प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
. वाढत्या उष्णतेमुळे जनतेची ससेहोलपट होत आहे वरोरा शहरातील मुख्य बाजार पेठेत ग्राहकांची वर्दळ असते.शहरी व ग्रामीण भागातील जनतेची एकच गर्दी असते. उष्ण उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी संरक्षण म्हणून लोकांजवळ निरुपाय असून कडक उन्हात लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने लोकांना विसावा व विश्रांती घेण्यासाठी मुख्य बाजारपेठ परिसरातील एकमेव गांधी उद्यान लोकांच्या सेवेसाठी खुले करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अतुल वानखेडे यांनी निवेदनाद्वारे नगरपरिषद प्रशासनाला केली आहे. नगरपरिषद प्रशासन कोणता निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.