शिरणा नदीवरील ” तो” पूल जीवघेणा

148

प्रशासनाचे दुर्लक्ष

माजरी : शिरणा नदीवर बांधण्यात आलेल्या अरुंद पुलामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या पुलावरून खाली पडून कित्येक नागरिकांनी आपला जीव गमविला आहे.तर काही नागरिकांचे हातपाय तुटून कायमचे अपंगत्व आले आहे संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने हा पूल जीवघेणा ठरला आहे.

.        चंद्रपूर -माजरी -वणी या मुख्यमार्गावर असणाऱ्या शिरणा नदीवर बांधलेल्या पुलाची अवस्था दयनीय आहे हा पूल माजरी क्षेत्र येथील प्रवाशांसाठी खूप महत्वपूर्ण असून या पुलावरून चालबर्डी, भद्रावती, कोंढा, देऊळवाडा, पळसगाव, नागलोण, विस्लोण, कुचना, बाजारपेठेसाठी भद्रावती इत्यादी गावातील नागरिकांची नियमित रहदारी सुरूच असते, हा मुख्य रहदारीचा पुल अरुंद असून या पुलाला कोणतेच संरक्षक कठडे नाहीत, या पुलावरून एकावेळी फक्त एकच मोठे चारचाकी वाहन जाऊ शकते एवढा अरुंद रस्ता पुलावर असल्याकारणाने मोठे वाहन आल्यास दुचाकी स्वार पण पुलाखाली पडून दुखापत होत आहे व प्रवाश्यांना हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. मागील काही वर्षापासून या पुलावर अपघाताचे जणू सत्रच सुरू आहे.दरम्यान या पुलावरून वे.को.ली. कर्मचारी दिगंबर चकौर रा. माजरी वस्ती,सुभाष लक्ष्मण तलांडे रा. पळसगाव, यांचा या पुलावरून खाली पडून मृत्यू झाल्याच्या घटना आहेत. कधी ऑटो, कधी सुमो, कधी दुचाकी स्वार यापूर्वीही या पुलाखाली पडल्याच्या अनेक घटना आहेत, काही किरकोळ जखमी तर काहीना गंभीर दुखापती झाल्या असून दरम्यान काल पुन्हा दिनांक ७ मार्च रोज शुक्रवारला दुपारी १:३० ते २ वाजताच्या सुमारास चालबर्डी येथील रहिवाशी असलेले बंडू बबन डाहुले वय अंदाजे ५२ वर्ष हे जीवनावश्यक घेऊन घरी जात असतांना याच पुलावरून खाली पडून त्यांचा पाय तुटल्याची घटना घडली आहे.दरम्यान त्यांना प्राथमिक उपचारासाठी माजरी येथील रुग्णालयात दाखल केले असता चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. गंभीर दुखापत लक्षात घेता, वैद्यकीय अधिकारी यांनी तत्काळ जिल्हा स्थळी चंद्रपूर रेफर करण्यात आले.

.       दरम्यान हा पूल चंद्रपूर जिल्ह्यातून माजरी मार्गे जिल्हा यवतमाळ वणी ला जोडला जाणारा माजरीचा मुख्य मार्ग असून दोन जिल्ह्याना जोडणारा सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे, या पुलावरून वरोरा, कुचना, भद्रावती, येथील वे. को. ली. कर्मचारी यांची रोजची रहदारी आहे तसेच हा पूल उंचीला कमी असल्याकारणाने पावसाळ्यात शिरणा नदीपात्राच्या पाण्यामध्ये वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होते मात्र लहान सहान पुरामुळे हा मार्ग लवकरच बंद होऊन परिसरातील अंदाजे ९ गावचा संपर्क तुटून रहदारी ठप्प होते आहे. दरम्यान वेकोली कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी वेळेवर पोहचायला अडचणी निर्माण होत आहेत.

अरुंद, व कमी उंची असलेल्या पुलाच्या ठिकाणी संबंधित प्रशासनाने नविन रुंद, उंच व संरक्षण कठडे असलेल्या पुलाची निर्मिती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.                                                                                                                                        गणेश भोयर,                                                                          माजरी वस्ती 

या पुलाच्या बांधकामाला भरपूर वर्ष झाली आहेत त्यामुळे या पुलाची भार वाहन क्षमता कमी झाली असून हा पूल अरुंद आहे व कोणतेही संरक्षण कठडे नसल्याकारणाने प्रवाश्यांना आपला जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने या पुलाच्या बांधकामासाठी विशेष लक्ष देण गरजेचे आहे.                                                                                                                             राजू उपरे,                                                                             चालबर्डी