नालीतून वाहत गेलेल्या आठ वर्षीय बालिकेला वाचविणार्‍या त्या देवदूताचा सत्कार

50

भद्रावती ऑटो असोसिएशन चा उपक्रम

भद्रावती

.           स्थानिक बस स्थानकासमोरील राज्य महामार्गाला लागून असलेल्या नालीतून वाहत गेलेल्या आठ वर्षीय बालिकेला छगन बुरडकर या ऑटो चालकाने चक्क तिचा जीव वाचविला. अशा या देवदूताचे भद्रावती ऑटो असोसिशन च्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

.           दिनांक २४ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भद्रावतीत अचानक मुसळधार पाऊस कोसळला तेव्हा तालुक्यातील पिरली येथील सानवी मंगेश आसुटकर ही ८ वर्षीय बालिका भद्रावती बस स्थानकासमोरील राज्य महामार्गाला लागून असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या नालीतून वाहत गेली. ती जवळपास ४०० फूट अंतरापर्यंत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. तिने नालीच्या चेंबर वरील फरशीला धरून वाचवा वाचवा अशी विनवणी केली. अशातच ऑटो चालक छगन बुरडकर हा त्या ठिकाणी देवदूतच अवतरला. तिचे हाताची बोटे धरून त्याने शेजारील नागरिकांना मदतीसाठी बोलाविले. जमलेल्या लोकांनी नालीवरील सिमेंट काँक्रीटचे चेंबर उचलून त्या बालिकेला नाली बाहेर काढले. यातून ती बालिका सुदैवाने बाल बाल बचावली बालिकेच्या आई-वडिलांनी ऑटो चालकाचे आभार मानले. त्याच्या या साहसाबद्दल भद्रावती ऑटो असोसिएशन च्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष बाळूभाऊ उपलंचीवार यांचे हस्ते एका समारोहात त्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. ऑटो चालक छगन बुरडकर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.