डोंगरगाव खडी येथे शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

33

 

भद्रावती

.          भद्रावती तालुक्यातील मौजा डोंगरगाव खडी येथील शेतकर्यालने सततच्या नापिकीने व यावर्षी सोयाबीन चे हातात आलेले पीक करपल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना डोंगरगाव खडी येथे घडली. गजानन देवराव राजूरकर ( 42) असे शेतकर्यां चे नाव आहे.

.          प्राप्त माहितीनुसार भद्रावती तालुक्यातील डोंगरगाव खडी येथील शेतकरी गजानन देवराव राजूरकर यांचे वडील गेल्या 5 वर्षांपासून बेपत्ता आहे. त्यांचे नावे 6 एकर शेती असून त्या शेतीच्या भरोशावर मुलगा गजानन आपल्या कुटुंबाच पालन पोषण करीत होता. शेतीची मशागत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 1 लाख 58 हजाराचे कर्ज घेतले होते. या वर्षी सोयाबीन चे उत्पन्न भरघोष होणार अशी आशा असताना अचानक सोयाबीन पिकावर रोग आला आणि शेतातील सोयाबीन पीक पिवळे येऊन करपू लागले. हातात आलेले पीक हातातून जात असल्याने कर्ज कसे फेडायचे या विवचनेत असलेल्या गजानन ने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांची माहिती कुटुंबाना मिळताच त्यांनी लगेच उपजिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे नेण्यात आले. उपचार सुरु असतांना 15 सप्टेंबरला मृत्यू झाला. गजानन च्या मृत्युने गावामध्ये शोककळा पसरली. त्याचे मागे त्याची आई सुशीला राजूरकर, पत्नी कुंता राजूरकर व दोन लहान मुले आहेत.