२४ सप्टेंबरला भद्रावतीत “ एक संवाद विद्यार्थ्यांसोबत ” विशेष कार्यक्रम.

45

शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे रोटरी क्लबचे आवाहन

भद्रावती

आय. ए. एस. मिशन, स्पर्धा परीक्षा विषयक व तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती बरोबरच कृषी विषयक माहिती यावर तज्ञ मंडळीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहे . यावेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद केला जाणार आहे. सदर कार्यक्रम दिनांक २४ सप्टेंबर रविवारला सकाळी ११.३० वाजता भद्रावती येथील श्री साई आयटीआय (जुनी मनोहर टॉकीज) सेमिनार हॉलमध्ये होणार आहे .
या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख आय. ए.एस. मिशनचे प्रमुख अमरावती अकॅडमी संचालक प्रा. डॉ .नरेशचंद्र काठोळे, प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य विकास आणि उद्योजकता नागपूर विभागाचे माजी सहाय्यक संचालक मिलिंद हांडे, तर कीटक शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ सल्लागार तथा विषयांतर्गत वृत्तवाहिनी वर प्रसारण असलेले मिलिंद राऊत, शासकीय तांत्रिक विभागाचे सेवानिवृत्त निदेशक सुनील भुसे, प्रा. डॉ.चंद्रकिरण घाटे विविध विषयाच्या अनुषंगाने तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन लाभणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे तथा न.प.चे अध्यक्ष अनिल धानोरकर, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक जनमंच सदस्य, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तीराणिक उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजना करता रोटरी क्लब येथील पदाधिकारी व सदस्य सर्व एकवटले असून, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री. साई आय.टी.आयचे संचालक, रोटरी क्लबचे प्रोजेक्ट हेड प्रमुख किशोर पत्तीवार , अॅड. युवराज धानोरकर ,प्राचार्य सचिन सरपटवार ,डॉ. ज्ञानेश हटवार,प्रा.आत्माराम देशमुख,प्रा संजय बोरकुटे प्रा . विशाल गौरकार यांनी केले आहे