Home चंद्रपुर जिल्हा विशेष ८ किलो ७९५ ग्रॅम गांजा जप्त

८ किलो ७९५ ग्रॅम गांजा जप्त

11

चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेचा दणका

रहमतनगर परिसरातील भाड्याच्या घरातून साठा हस्तगत

दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल

चंद्रपूर : अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध चंद्रपूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. शहरातील रहमतनगर भागातील एका भाड्याच्या घरातून ८ किलो ७९५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, याची बाजारभावानुसार किंमत ८९ हजार १५० रुपये आहे. या प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

.       रहमतनगर येथील केजीएन लॉन परिसरातील एका घरात गांजा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी, २ एप्रिल रोजी धाड टाकली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला.

आरोपींची ओळख
या प्रकरणात अब्दुल शाहरुख अब्दुल रज्जाक (३५, रा. दर्गा वॉर्ड, घुटकाळा) आणि मोबीन अशी आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act, 1985) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली. सध्या फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

error: Content is protected !!