भद्रावतीत १ मे रोजी श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व भजन सोहळा

5

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन

जिल्ह्यातील भाविकांची होणार एकच गर्दी

भद्रावती : अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर गुरुवार दि. १ मे रोजी दुपारी २ वाजेपासुन तर सायंकाळी ८ वाजेपर्यंत स्थानिक बाजार वॉर्डातील रवींद्र शिंदे यांच्या निवासस्थानी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व भजन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

.     याप्रसंगी स्थानिक रवींद्र शिंदे यांच्या निवासस्थानी दि. १ मे रोज गुरुवारला दुपारी १ वा. शेगावचे गजानन महाराज, भांदेवाडाचे जगन्नाथ महाराज, अमरावती जिल्ह्यातील घुईखेड येथील सजीवन समाधिस्त श्री संत बेंडोजी महाराज, यांचे पादुका पुजन आणि दर्शनाचा लाभ उपस्थितांना घेता येईल.

.       या दर्शन व पूजन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले ट्रस्टचे संस्थापक सदस्य रवींद्र शिंदे यांनी केले आहे. या सोहळ्यादरम्यान सायंकाळी ४ वाजेपासून महाप्रसाद वितरण करण्यात येईल.