विवेकानंद महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र तथा गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ
भद्रावती : येणारे युग स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःतील सुप्त कलागुणांना योग्यप्रकारे चालना देऊन आपले व्यक्तिमत्व प्रभावी बनवावे. वाचन वाढवावे. जेणेकरून स्पर्धेच्या युगात आपला टिकाव लागू शकेल, असे विचार गोंडवाना विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या पदवी प्रमाणपत्र तथा गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभात
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
. यावेळी अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान होते. प्रमुख अतिथी म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा चे सहसचिव राजेंद्र गावंडे, बेहरीन रिटर्न सेवानिवृत्त प्रा. धनराज आस्वले, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे मंचावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष पू.वा. स्वान यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी पदवी परीक्षांचे अध्ययन करता करता जीवणोपयोगी अनेक कौशल्ये आत्मसात करावे. अर्थातजनाकडे कसे वळता येईल यासाठी प्रयत्न करावे. आई-बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी कर्तृत्वशील नागरिक बनावे असे सांगितले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 2023-24 या शैक्षणिक सत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ गुणवंत विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात पारितोषिके वितरित करण्यात आली या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे असणारा बेस्ट लायब्ररी यूजर पुरस्कार जिनत परवीन पठाण, आदर्श विद्यार्थी पुरस्कार स्नेहल माणूसमारे आणि जिनत परवीन पठाण यांना प्रदान करण्यात आला.
. यावेळी महाविद्यालयातून इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेल्यांपैकी एमबीबीएस व बीएएमएस ला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा शाॅल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. गजानन खामनकर, प्रा. नरेंद्र लांबट यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, आभारप्रदर्शन डॉ. जयवंत काकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कठोर परिश्रम घेतले.