आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
रखरखत्या उन्हात प्रवाशांना मिळाला दिलासा
आ. मुनगंटीवार यांचे प्रवाशांनी मानले आभार
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची जनतेप्रती असलेली तत्परता आणि संवेदनशीलतेची नागरिकांना पुन्हा एकदा प्रचिती आली. मुल बसस्थानकावरील आरओ मशीन बंद पडल्याची तक्रार काहींनी त्यांच्याकडे केली. आ. मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाला निर्देश दिले. आणि आता ते आरओ मशीन सुरू होऊन प्रवाशांना पिण्याचे थंड पाणी देखील मिळायला लागले आहे. प्रवाश्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
. जगात उष्णतेसाठी चंद्रपूर जिल्हा ओळखला जातो. शरीराची लाही लाही करणाऱ्या या कडक उन्हात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असणे हा प्रवाशांचा अधिकार आहे. मात्र, काही दिवसांपासून मुल येथील एसटी बसस्थानकावरील आरो मशीन बंद पडल्यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही माहिती मुल येथील स्थानिक नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या संवेदनशीलतेला साद घातली. क्षणाचाही विलंब न करता, आ. मुनगंटीवार यांनी थेट एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे यांच्याशी संपर्क साधून मशीन तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.
. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानंतर अवघ्या काही तासांत हे आरओ मशीन दुरुस्त होऊन पुन्हा सुरू करण्यात आली. परिणामी, प्रवाशांना पुन्हा पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध झाले असून मोठा दिलासा मिळाला आहे.
. याबाबत अनेक प्रवाशांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. जनतेच्या गरजेला तात्काळ प्रतिसाद देत त्यांच्या सेवेसाठी सदैव सज्ज असलेले आ. मुनगंटीवार यांची ही कृती जनतेतील विश्वास दृढ करणारी आहे. सजगता आणि तत्परता हाच जनसेवेचा मंत्र आहे, हे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले, हे विशेष.