कोरपना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेसचा झेंडा

7

शेतकरी संघटना – भाजप युतीला केवळ एक जागा

कोरपना : कोरपना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समिती साठी मतदान व मतमोजणी रविवार दिनांक २० एप्रिलला पार पडली. यात १३ पैकी १२ जागेवर काँग्रेस तर केवळ एका जागेवर शेतकरी संघटना – भाजप युतीच्या उमेदवाराचा विजय झाला.

.   सर्वसाधारण खातेदार गटातून रमेश धारणकर, विनोद कोल्हे, मारोती रासेकर, निखिल गिरटकर, दादाजी गोवरदिपे, संदीप पारखी, वामन पिंगे, बापूराव जोगी, सुभाष तुरणकर, महिला राखीव गटातून सुनंदा दिलीप मालेकर, संगीता चरणदास इटणकर, विमुक्त जाती भटक्या जमाती विमाप्र गटातून रामचंद्र इखारे, अनु सुचित जाती जमाती गटातून रामदास पंधरे विजयी झाले. यातील रमेश धारणकर यांची यापूर्वीच अविरोध निवड झाली होती. बापुराव जोगी व सद्दाम लियाकत अली यांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी मध्ये बापुराव जोगी विजयी झाले. यात शेतकरी संघटना – भाजप युतीतील सुभाष तुराणकर एकमेव उमेदवार विजयी झाले.

.      निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. पी. दोनाडकर यांनी काम पाहिले. निवडणूक निकालानंतर कोरपना शहरातून विजयी रैली काढण्यात आली. ही निवडणूक माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे संचालक विजय बावणे यांच्या नेतृत्वात लढण्यात आली होती. विजय रॅलीत तालुका काँग्रेस अध्यक्ष उत्तम पेचे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक बावणे, माजी सभापती श्याम रणदिवे, भारत चन्ने, नगर उपाध्यक्ष इस्माईल शेख, मनोहर चन्ने, नितीन बावणे, सुरेश मालेकर आदी सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.