पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम
वरोरा : वरोरा नगर पालिकेचे माजी नगरसेवक पंकज नाशिककर आणि मोहबाळा ग्रामपंचायत चे सरपंच नंदु टेमुर्डे यांनी दि. १७ एप्रिल रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समक्ष मुंबई येथे शिवसेना (उबाठा) पक्ष प्रवेश करीत शिवबंधन बांधले.
. याप्रसंगी शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी शिवसैनिकांना जी शपथ घालून दिली होती त्या शपथपत्राचे विमोचन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे, वरोरा विधानसभा संपर्क प्रमुख रितेश रहाटे व राजुरा विधानसभा प्रमुख अनिल कदम यांचे उपस्थितीत वरोरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक पंकज गणेशराव नाशिककर व मोहबाळाचे सरपंच नंदु टेमुर्डे यांचा पक्ष प्रवेश झाला.
. जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृवात जिल्ह्यात सामाजिक व राजकीय कार्य सतत सुरु आहे. या कार्याला प्रेरित होऊन अनेकजण शिवसेना (उबाठा) पक्षात अनेक कार्यकर्त्यांसह सतत प्रवेश घेत आहेत. पंकज नाशिककर व नंदु टेमुर्डे यांचे तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, युवासेना विस्तारक मनीष जेठानी, सुनील मोरे, लक्ष्मण ठेगणे, मारोती नागपुरे, वैभव डहाणे, संजय उमरे, महेश राऊत, प्रमोद कातोरे, सोहेल पठाण तथा चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) कडून अभिनंदन करण्यात आले.