शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्यांचा विरोध
जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना पाठविला राजीनामा
वरोरा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आगळेवेगळे आंदोलन करून राज्यभर प्रसिद्ध असलेले वरोरा तालुक्यातील आसाळा येथील शेतकरी, शेतकरी नेते व काँग्रेस चे जिल्हा किसान सेल सहसचिव किशोर डुकरे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना पाठविल्याने काँग्रेस पक्षात खळबळ माजली असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचाच विरोध असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे किशोर डुकरे यांनी दैनिक नवजीवन ला सांगितले.
. शेतकरी नेते म्हणून ओळख असलेले किशोर डुकरे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यावर व नेतृत्वावर विस्वास ठेऊन वर्ष भरा पूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता. किशोर डुकरे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देत असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी डुकरे यांना जिल्हा कांग्रेस सहसचिव पदी निवड केली.
. किशोर डुकरे यांच्या कडे काँग्रेस चे किसान सह सचिव पद मिळाल्या नंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी विविध प्रकारचे अनोखे आंदोलने केली. त्यात त्यांच्या आंदोलनाला यश ही आले मात्र शेतकऱ्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे एकही कार्यकर्ते किंवा नेते राहत नसल्याने डुकरे यांनी खंत व्यक्त केली तर काही दिवसापूर्वी किशोर डुकरे यांनी 200 शेतकरी घेऊन चंद्रपूर नागपूर महामार्ग रोखून धरण्यासाठी वरोरा शहरातील रत्नमाला चौकात रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाला काही काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी इतर कार्यकर्ताना आंदोलनात सहभागी होण्यास मज्जाव घातला होता . त्यामुळे काँग्रेस पक्षातील काही पदाधिकारी शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस चे जिल्हा किसान सेल सहसचिव पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना पाठविण्यात आला असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचाच विरोध असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे किशोर डुकरे यांनी दैनिक नवजीवन ला सांगितले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठबळ मिळत नाही मी शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन करीत आहे. मात्र काँग्रेस चे स्थानिक पदाधिकारी आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते यांच्या कडून शेतकरी विषयावर होत असलेल्या आंदोलनास कुठलेही पाठबळ मिळत नसल्याने मी आपल्या पक्षाचा आणि पदाचा राजीनामा आपल्या मर्जीने देत आहे. या पुढे माझा पक्षाशी कुठल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. किशोर डुकरे, शेतकरी नेता