पोलिसांची धमकी देत अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटले

38

2 हजाराची केली मागणी दोनशे रुपये घेऊन पळाले

सामाजिक माध्यमावर त्या बँक कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल

गांगलवाडी टी पॉइंट जवळील घटना

ब्रम्हपुरी : बैल बाजारातून शेती कामासाठी शेतकऱ्यांनी दोन बैल खरेदी करून पिकअप वाहनाने बैल जोडी गावाकडे नेत असताना अचानक गांगलवाडी टी पॉइंट अर्बन को ऑपरेटिव्ह बँक ची जप्ती वसुली पथक लिहिलेले असलेल्या कार मधील कर्मचाऱ्यांनी पिकअप बैल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याचे वाहन रोखले. आणि पिकअप मध्ये जनावरे नेणे अवैध आहे असे म्हणत शेतकऱ्यांना पोलिसांची धमकी देत 2 हजार रुपयाची मागणी केली मात्र शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या खिशातील दोनशे रुपये या कर्मचाऱ्यांना दिले. हा सर्व प्रकार उपस्थित असलेल्या काहींनी मोबाईल मध्ये कैद करीत सोशल मीडियावर वायरल केल्याने खळबळ माजली आहे.

.     ब्रम्हपुरी येथे दर रविवारला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरत असते या बाजारात परिसरातील अनेक शेतकरी गाई,बैल, शेळी आदी जनावरांची खरेदी विक्री होत असते. अशातच रविवारला एका शेतकऱ्याने बैल बाजारातून शेतीकामासाठी दोन बैल विकत घेतले व पीक अप चार चाकी वाहनाने आपल्या गावाकडे जात असताना गांगलवाडी टी पॉइंट नजिक ब्रम्हपुरी तील अर्बन को. ऑफ बँक चे कर्मचारी आपल्या बँकेचे नाव असलेले व गाडीवर जप्ती वसुली पथक लिहिलेले असलेल्या गाडीतून उतरून शेत कामासाठी बैलाची विक्री करून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पीक अप गाडीला थांबावून पैशाची खुले आम मागणी करीत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.विशेष बाब म्हणजे यातील एक बँकेचा कर्मचारी अनेक वर्षापासून गोरक्षकाचे काम करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये दोन बँकेचे कर्मचारी शेतकऱ्याची गाडी थांबवून पोलिसाची धमकी देत पैशाची मागणी करताना दिसते.पण शेतकऱ्याकडे त्यांच्या मागणी नुसार पैसे नसल्याने खिशात असलेल्या दोनशे रुपये काढून शेतकऱ्यांनी वसुली खोर असलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिले. त्या वसुली बाज बँक कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपयाची मागणी केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे. तर अर्बन बँकेचे सदर दोन कर्मचारी त्या शेतकऱ्याला धमकी देत असल्याचे ही दिसते.हा प्रकार महाराष्ट्रात अशोभनीय असून जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी बांधव सुध्दा सुरक्षित नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

.       समाज माध्यमावर सदर प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्या वसुली बाज अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यावर बँकेचे प्रशासन कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तर सदर व्हायरल व्हिडिओ ची गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासन कोणती कारवाई करणार याकडेही नागरिकांचे लक्ष लागून आहे तर शेतकऱ्याला धमकी देऊन लुटणाऱ्या वसुली बाज कर्मचाऱ्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.