चंद्रपुर नागपुर महामार्गावर शेतकर्‍यांचे चक्का जाम आंदोलन

146

हजारो शेतकर्‍यांची उपस्थिती

काही वेळातस आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन

वरोरा : शेतकऱ्यांच्या हितकारक विविध समस्या शासन – प्रशासनाच्या दरबारी प्रलंबित आहे. या मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील वरोरा येथील रत्नमाला चौक येथे सोमवारी दि. १० मार्च ला दुपारी १ वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलिस प्रशासनाने काही वेळातच शेतकरी नेते किशोर डुकरे यांना व आंदोलनकारी शेतकऱ्यांना ताब्यात घेत आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला.

.       सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रत्नमाला चौक वरोरा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात तालुक्यातील व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी उपस्थिती दर्शविली होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन वरोरा येथील रत्नमाला चौकात शेतकरी नेते किशोर डुकरे शेतकर्‍यांना घेऊन राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे शासन प्रशासन यांना माहिती देण्यात आली. या पत्राने प्रशासनात चांगलीच खळबळ माजली होती. यामुळे तहसिल कार्यालय वरोरा येथे  शुक्रवारी शेतकरी व विविध विभागातील संबंधित अधिकारी यांची तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली होती. हे मात्र विशेष. या बैठकीत किशोर डुकरे यांच्या निवेदनातील सर्व मागण्या कॅबिनेट मंत्री मंडळाचे असल्यामुळे संबंधित मागण्यांवर तोडगा काढू शकत नसल्याचे सांगण्यात आल्याने सोमवारी आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आंदोलन थांबविण्यात आले. मात्र मागण्या मंजूर झाल्या नाही तर या पेक्षाही तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा ही यावेळी शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी दिला.

या आहेत शेतकर्‍यांच्या मागण्या

  • 1 मार्च 2021 नंतर डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विज जोडणी संबंधित विभागाकडून करण्यात यावी. 
  • मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करून,मागील वर्षीचा कपाशी वरील पिक विमा तसेच चालू वर्षातील खरीप हंगामातील पिक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावा.
  • नाफेडची सोयाबीन खरेदी मुदत वाढविण्यात यावी तसेच भावामधील तफावत म्हणून शेतकरी यांना प्रति क्विंटल 500/- रुपये बोनस म्हणून देण्यात यावे.
  • सन 2024-25 मधील पूर्ण हंगाम होईपर्यंत सीसीआय ची कापूस खरेदी सुरु ठेवण्यात यावी.
  • गरजू शेतकरी यांना तात्काळ नवीन विज जोडणीसाठी डिमांड देण्यात यावे.

आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न                                                                                                                                                            कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी आंदोलनकारी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे.परंतु सदर चक्का जाम आंदोलन हे चंद्रपूर – नागपूर महामार्गावर करण्यात आल्याने वाहतूक विस्कळित झाली होती.वाहतूक विस्कळित होऊन जनतेला त्रास होऊ नये व कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये .यासाठी पोलिसांनी आंदोलनकारी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.  

यापेक्षा तीव्र आंदोलन करू                                                                                                                                                             शासन व प्रशासनाच्या वेळकाढू व दुर्लक्षित धोरणामुळे मागणी करण्यात आलेल्या एकाही समस्याचे निवारण होऊ शकले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. प्रशासनाने समस्यांची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा किशोर डुकरे यांनी दिला आहे.                                                                                                                                             किशोर डुकरे,                                                                     शेतकरी नेते, वरोरा