- महायुती – मविआत इच्छुकांची भाऊगर्दी
विधानसभा निवडणूक 2024
रवी खाडे
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी (दि. २२) जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांच्याकडून जारी करण्यात आली मात्र वरोरा विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा तिढा अजून संपला नाही. महायुती आणि महाविकास आघाडीची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. यात कोणता भाऊ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
. विदर्भातील १२ जागे साठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू असल्याने जागा वाटपाचा गुंता वाढला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केल्यानंतर धानोरकरांनी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील सहा ही जागेवर दावा केला आहे. खासकरून वरोरा विधानसभा त्यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्या प्रयत्न करीत असल्याचे ही बोलल्या जात आहे. तर विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार डॉ. खुटेमाटे यांना उमेदवारी देण्यासाठी हट्टाहास करीत असल्याची माहिती आहे. तर काँग्रेस चे राहुल गांधी यांनी हरियाणा तील पराभवा नंतर घराणेशाही चा मुद्दा उचलून धरला व पक्षातील योग्य कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळावी अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी प्रसार माध्यमाना दिल्याने घराणेशाहीत उमेदवारी मागणाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. वरोरा विधानसभा साठी काँग्रेस कडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रवीण काकडे, डॉ. चेतन खुटेमाटे, प्रशांत काळे, डॉ. हेमंत खापणे, दिनेश चोखारे, राजू चिकटे यांनी दावेदारी केली तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाकडून मुकेश जिवतोडे व रवी शिंदे यांनी दावेदारी केली. मात्र दोन्ही पक्षात सुरु असलेल्या वाटाघाटित नेमकी कोणाला वरोरा विधानसभा क्षेत्राची जागा जाणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.
.
. दुसरीकडे महायुतीतील जागा शिवसेनेच्या वाटेला जाणार आहे आणि शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार ही ठरल्याच्या चर्चेला ऊत आले होते. यामुळे भाजपा मधील इच्छुकाच्या इच्छेत विरजण पडले. काहींनी नागपुरातील भाजप नेत्याच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केले होते. तर काहींनी दिल्ली गाठली. मागील पाच वर्षांपासून आमदारकीचे डोहाळे लागलेले भाजचे रमेश राजूरकर, नरेंद्र जिवतोडे, किशोर टोंगे, अहेतेशाम अली सह अनेकांनी कामाला सुरुवात केली मात्र वरोरा विधानसभा कोणाच्या गळ्यात पडतील हे मात्र सांगता येत नाही. पण ही जागा शिवसेनेला सुटली तर भाजप मध्ये बंडखोरी होणार हे मात्र तितकेच खरे. ग्रामीण भागाशी नाळ असलेले नरेंद्र जिवतोडे हे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहे तर अहेतेशाम अली हे ज्या पक्षांकडून एबी फार्म मिळतील तिथून लढणार या पवित्र्यात असल्याचे समजते. तर डॉ. सागर वझे हे वेट अँड वॉच भूमिकेत आहेत. तर रस्ते परिवहन आणि राज्य महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अगदी जवळचे समजले जाणारे युवा नेतृत्व वामन तुर्के यांनी सुद्धा मी लढणार अशी भूमिका घेत वरोरा शहरात वाढदिवसा निमित्त देण्यात आलेल्या पार्टी तुन अनेकांनी समजून घेतले तुर्के हे नेमकी कोणती भूमिका घेतील याकडे सुद्धा अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.