आनंदनिकेतन महाविद्यालयाचे अकरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

20

वरोरा : आनंदनिकेतन महाविद्यालयाचे आर्ट्स,सायन्स, कॉमर्स सन 1964 ला सुरू झाले. सामाजिक सेवेचा वसा असणाऱ्या महाविद्यालयाने कायमच गुणवत्तापूर्वक शिक्षणाला प्राधान्य दिले. 1964 पासून महाविद्यालयाने सांस्कृतिक सामाजिक तथा शैक्षणिक क्षेत्रात जी उंची गाठली होती ती आजही कायम ठेवली आहे.

2016-17 पासून आनंद निकेतन महाविद्यालयात एम.एस.सी सुरू करण्यात आले.विशेष म्हणजे तेव्हापासून सातत्याने एम.एस.सी च्या परीक्षेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये येत आहेत.अभिमानाची बाब म्हणजे सन 2023-24 या वर्षातही महाविद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने एम. एससी, एम ए, एम. कॉम व बी.एससी, बी.ए व बी. कॉम परीक्षांच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. यावर्षी अभिमानाची बाब म्हणजे एम. एससी वनस्पतीशास्त्र या विषयात मेरिट लिस्ट मधले तीन विद्यार्थी महाविद्यालयाचे आहेत. वैष्णवी लोहकरे व मयुरी नन्ने व किरण धनविज यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, व पाचवा येण्याचा मान मिळवला. एम. एस्सी रसायनशास्त्र या विषयात प्रियंका नौकरकार व मीनल बोंडे यांनी अनुक्रमे गुणवत्ता यादीत दुसरा व पाचवा येण्याचा सन्मान प्राप्त केला. 2020-21 या वर्षात महाविद्यालयात एम.ए. सुरु करण्यात आले. या वर्षी एम.ए. राज्यशास्त्र या विषयात निकिता कापसे व एम.ए. अर्थशास्त्र या विषयात तेजस्विनी डाहुले यांनी चौथा मेरिट येण्याचा सन्मान प्राप्त केला. आश्र्विनी नन्नावरे हिला बी. एससी पदवीमधून प्रथम स्थान मिळाले. आणि विशेष म्हणजे आश्र्विनी नन्नावरे हिला बीएस्सी वनस्पतीशास्त्र या विषयात विद्यापीठातून सर्वात जास्त गुण ही मिळाले.
यासोबतच अभिमानाची बाब म्हणजे बी. कॉम ची अनुजा खिरटकर ही विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत प्रथम आली आहे. एम.कॉम ची विद्यार्थिनी प्रणाली ढेंगळे ही आठवी मेरिट आली.

.     महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, आनंदवन विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी सर्वच जण विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करत आहे.