बल्लारपुरात तलवार धारक आरोपीला अटक

11

आजतागायत पोलिसांनी सहा तलवारी केल्या जप्त

आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल

विसापूर : आजघडीला सर्वत्र सणासुदीचे वातावरण आहे. सण आणि उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था व्यवस्था धोक्यात येऊ नये, म्हणून पोलिसांनी धरपकड मोहीम सुरु केली आहे. याच मोहिमेंतर्गत शनिवार (दि. २१) सप्टेंबर रोजी सायंकाळी ६. १५ वाजता बल्लारपूर शहरातील सुभाष वार्डातून एका आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी तलवार सह अटक केली आहे. आजतागायत पोलिसांनी सहा जणांना तलवार सह अटक करून गजाआड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेतील आरोपीचे नाव हिरा ईश्वर बहुरिया (४१ ) रा. सुभाष वार्ड, बल्लारपूर असे आहे.

.       बल्लारपूर शहरातील सुभाष वार्ड मधील जोक्कु नाला भागातील हिरा बहुरिया या नावाच्या इसमाच्या घरी तलवार शस्त्र असल्याची माहिती खबरी द्वारे मिळाली. त्याचा हेतू शहरात तलवार शस्त्राच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा आहे. यामुळे पोलीस सतर्क झाले.या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस पथकाने त्याच्या घराची झडती घेतली.तेव्हा पोलिसांना त्याच्या घरात धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी पंचासमक्ष घटनेचा पंचनामा करून तलवार व आरोपी हिरा बहुरिया याला अटक केली.

.       विशेष म्हणजे बल्लारपूर पोलिसांनी गणपती उत्सव व ईद निमित्त तब्बल सहा आरोपी कडून तलवार शस्त्र जप्त करून गजाआड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिरा बहुरिया याचे विरुद्ध आर्म अॅक्ट नुसार बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, उपनिरीक्षक गोविंद चाटे, उपनिरीक्षक हुसेन शाह, सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलिस कर्मचारी गजानन डोईफोडे, सुनील कामटकर, पुरूषोत्तम चिकाटे, रणविजय ठाकूर, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, शेखर माथनकर यांच्या पथकाने केली आहे.