अवैद्य रेती वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पकडले

8

वरोरा : अवैद्य उत्खनन तपासणी करिता गेलेल्या भरारी पथकाला अवैद्य रित्या रेती गौण खनिजाची वाहतूक करताना आढळून आलेल्या दोन ट्रॅक्टरला पकडत तहसील कार्यालय वरोरा येथे जप्तीची कारवाही करण्यात आली. या कारवाहिने पुन्हा एकदा अवैद्य रेतीची तस्करी करणार्‍या तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

.       वरोरा तालुक्यात अवैद्य रेती तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. यावर आळा घालण्यासाठी वरोरा तहसीलच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करून अवैद्य उत्खनन तपासणी करिता मंडळ अधिकारी, टेमुर्डा, तलाठी, टेमुर्डा, तलाठी, सुमठाना दौऱ्यावर असतांना मौजा – खापरी  गावाच्या परिसरात ट्रॅक्टर क्रमांक एमएच 34 एपी 0295 या वाहनातून 100 घनफुट (1 ब्रास) रेती गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा (डिटेन) करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा / पंचनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन / पंचनाम्यावरुन सदर वाहन विठ्ठल संतोष देवतळे रा. खापरी ता. वरोरा जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद आहे.

.       तर 21 सप्टेंबर 2024 रोजी अवैध उत्खनन तपासणी करीता मंडळ अधिकारी, शेगांव, तलाठी, जळका तलाठी, सोईट दौऱ्यावर असतांना सकाळी  9:35 वाजताचे सुमारास मौजा – जळका-माढेळी गावाच्या परिसरात ट्रॅक्टर क्रमांक एमएच 34 बीव्ही 4694 या वाहनातून 100 घनफुट ( 1 ब्रास) रेती गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा (डिटेन) करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा / पंचनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन / पंचनाम्यावरुन सदर वाहन रामचंद्र मारोती येरचे रा. माढेळी ता. वरोरा जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद आहे. या दोन्ही घटनेमुळे अवैद्यरीत्या गौण खनिजाची तस्करी करणार्‍या तस्करांचे धाबे दणाणले असून या तस्करांविरोधात वरोरा महसूल विभाग पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे.