नादुरुस्त उभ्या ट्रकला ट्रकची धडक

9

चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावरील घटना 

चालक वाहक गंभीर जखमी

विसापूर : चंद्रपूर ते बल्लारपूर दरम्यान राज्य महामार्गावर नादुरुस्त ट्रक उभा होता. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने उभ्या ट्रकला जबरदस्त धडक दिली. या अपघातात एका ट्रकचे चालक व वाहक दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.ही घटना शुक्रवारी रात्री ९.30वाजता विसापूर जवळ भिवकुंड दरम्यान घडली. चालक सुशील उंदीरवाडे (35) व वाहक  नेहाल तायडे (34) दोघेही राहणार चंद्रपूर असे जखमींची नवे आहे.

.      नागपूर येथून तेलगंणा राज्यात ट्रक क्रमांक ( ए.पी.31/ टी.एच.८४२९ ) भरधाव वेगाने जात होता. विसापूर गावाच्या हद्दीतील भिवकुंड जवळ नुरानी ट्रांसपोर्ट समोर नादुरुस्त ट्रक रस्त्यावर उभा होता. त्यावेळी नादुरुस्त उभ्या असणाऱ्या ट्रक ला मागून जबरदस्त धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत टोल प्लाजावरील रुग्णवाहिकेच्या सहकार्याने जखमींना तातडीने चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेत नादुरुस्त ट्रक क्रमांक ( एम.एच.34/ झेड २६१3 ) चे देखील मोठे नुकसान झाले. त्याचे प्रमाणे धडक दिलेल्या ट्रक चे देखील नुकसान झाले. या घटनेचा अधिक तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.