धानोलीत “एक गाव एक गणपती”

40

मस्कऱ्या गणरायचे आगमन

आठ वर्षांची परंपरा आजही कायम

 भद्रावती : तालुक्याच्या धानोली गावातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एक गाव एक गणपती ही संकल्पना गेली अनेक वर्षापासून राबवत आहे. ही परंपरा गेल्या 8 वर्षांपासून सुरू आहे. ग्रामस्थांनी आपल्या या कृतीतून एक वेगळे अनुकरणीय पाऊल टाकत सर्वांपुढे आदर्शच उभा केला आहे. चंद्रपुर-नागपुर महामार्गावरील नंदोरीपासून दहा कि. मी. अंतरावर असलेले धानोली गाव आहे.

.         गावात आठ वर्षापासून सह्याद्री मस्कऱ्या गणेश मंडळ धानोली यांचे विद्यमाने “एक गाव एक गणपती” मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. हे या गावातील परंपरा अजूनही कायम असून सर्व धर्मीय नागरिक गावात सुरू असलेल्या या कार्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

.         संकटचर्थुर्थी ला गणपतीचा सामूहिक मिरवणूक काढून गणरायाचे आगमन करण्यात आले. यामध्ये सह्याद्री मस्कऱ्या गणेश मंडळ धानोली चे अध्यक्ष गजानन खापणे, सचिव नितेश बोढे, सदस्य अमीर बोढे सह गावातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.