मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत बोंड शाळा तालुक्यात प्रथम

54

नागभीड :  महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 हे अभियान महाराष्ट्र राज्यातील सर्व जि. प व खाजगी शाळांकरीता राबविण्यात येत असून या अभियानात नागभीड तालुक्यातून जि. प. उच्च प्राथमिक शाळा, बोंड या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

.       विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, शालेय प्रशासनाचे बळकटीकरण व शैक्षणिक सुधारणा या घटकांवर आधारित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – टप्पा 2 या अभियानात सहभाग घेउन पायाभूत सोयी सुविधा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आमची परसबाग, आरोग्य तपासणी, एचपीसी प्रोफाईल, महावाचन चळवळीमध्ये सहभाग, क्रीडा सुविधा, विद्यांजली पार्टल, स्वयंम पोर्टल, एनएसक्युएफ, दप्तराविना शनिवार, इको  क्लब, स्काऊट व गाईड उपक्रम,वाचन कोपरे, वर्ग सुशोभिकरण, स्वयंअर्थ सहाय्यित ग्रामीण वाचनालयाची निर्मिती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी बचत बँक उपक्रम (स्थापना दि. 3 जानेवारी 2023, जमा रक्कम रुपये 1 लाख 40 हजार) अशा अनेकविध बाबींवर उत्कृष्ट काम केले.

.       संजय पालवे गटशिक्षणाधिकारी,  सुनिता भंडारे शि. वि. अ.,  भारत बोरकर केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली सदर अभियानाच्या यशस्वीते करीता शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार एकवनकर, शा.व्य.स. अध्यक्षा शारदा राऊत, उपाध्यक्ष  महादेव कुत्तरमारे, स.शि. रतिराम इरपाते, मंगला अनमुलवार, दिपक उईके, विषय शिक्षक लीना भुसारी, दुर्वेकांत बनकर, स्वयंपाकी सविता भागडकर, अमित भागडकर यांनी सहकार्य केले.