भद्रावती : शिवसेना (उबाठा) पक्षाची विधानसभा आढावा सभा स्थानिक श्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली. या सभेत मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेंडणेकर यांच्यासह सभेतील इतर मान्यवरांनी वरोरा, राजूरा, ब्रम्हपूरी व चिमूर विधानसभा क्षेत्रातील पुरूष व महिला पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतीतून आगामी विधानसभा निवडणूकीचा आढावा घेतला.
. या सभेत प्रमुख मार्गदर्शिका मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेंडणेकर यांच्यासह चंद्रपूर जिल्हा संपर्क संघटिका सुषमा साबळे, संपर्क संघटिका सोनाली म्हात्रे, पक्षाच्या निरीक्षक शालिनी सावंत आणि निधी शिंदे तसेच नागपूर जिल्हा संपर्क संघटिका मंदाकिनी भावे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम,जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे (वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र), युवा सेना सचिव तथा सिनेट सदस्य (गोडवाना विद्यापीठ गडचिरोली) प्रा. निलेश बेलखेडे आणि शिक्षक सेना जिल्हाप्रमुख राजेश नायडू प्रामुख्याने उपस्थित होते.
. याप्रसंगी महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, सुषमा शिंदे, उपजिल्हा संघटिका माया नारळे, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे, भद्रावती तालुका संघटिका आशा ताजने, वरोरा तालुका संघटिका सरला मालोकर, युवासेना विधानसभा प्रमुख अभिजीत कुडे, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर, विठ्ठल हनवते, भद्रावती कृ. उ. बा. समितीच्या उपसभापती आश्लेषा जीवतोडे भोयर, वरोरा कृ. उ. बा. समितीच्या संचालिका कल्पना टोंगे, भद्रावती शहर सघंटीका माया टेकाम, वरोरा शहर सघंटीका शुभांगी अहीरकर, भद्रावती शहर समन्वयक भावना खोब्रागडे, वर्षा ठाकरे व प्रा. प्रिती पोहाने यांच्यासह फार मोठया संख्येत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक बंधू-भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन गायत्री यामलावार यांनी केले.
गरजवंताना औषधोपचारासाठी आर्थिक मदत याप्रसंगी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजवंताना औषधोपचारासाठी जाहीर केलेली आर्थिक मदत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी किशोरी पेंडणेकर यांच्या हस्ते गरजवंतांच्या कुटूंबियांना देण्यात आली. माढेळी येथील अर्धांगवायू ग्रस्त गौतम कांबळे, कोसरसार येथील रामचंद्र कामटकर यांची पत्नी सुमन कामटकर कर्करोग झाल्याने, बोपापूर येथील नगाजी राऊत यांना कर्करोग झाल्याने आणि गोंडपिंपरी येथील अश्फाक शेख यांना सुद्धा कर्करोग आजार असल्याने औषधोपचारा साठी आर्थिक मदत देण्यात आली.