वडधा येथे शिवसेना (उबाठा) गटाच्या शाखेचे उद्घाटन संपन्न

62

जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

वरोरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन वडधा येथे जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुll

केश जिवतोडे यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याला गावातील आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित दर्शविली होती.

.              या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जिवतोडे यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर भाष्य केले आणि या शाखेच्या माध्यमातून गावात पक्षाचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखांचे माध्यमातून घरा घरात शिवसैनिक तयार करण्यात येत असून गावागावातील तरुण कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्षाचे जाळे विस्तारले जात आहे.आगामी विधानसभा निवडणुक अनुषंगाने त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे.

.          शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रसंगी मुकेश जिवतोडे यांनी पक्षाचे विविध मुद्दे मांडले आणि गावाच्या विकासासाठी शिवसेनेच्या या शाखेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात भाग घेतला आणि जयघोष करत नवीन शाखेच्या यशासाठी संकल्प केला. तसेच शाखा उदघाटन निमित्त युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले यांच्या नेतृत्वात वडधा येते वृक्षारोपण करण्यात आले.

.            यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड, विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय झिले, शाखा प्रमुख अंकुश नन्नावरे, ग्रामपंचायत सदस्य मुकिंदा शेळकी, मुकेश घुघल, निखिल कुळमेथे ग्रामपंचायत सदस्या रिता बुऱ्हाण, गजानन ठाकरे, रोशन नन्नावरे ,अनिकेत नन्नावरे, मंगेश भोयर, पवन दरेकर, योग्यश हिवरे, जिवन लिल्हारे, दिपक गेडाम, विशाल शिवसागर, कुणाल शिवसागर, करन पोहिनकर, आशिष गेडाम, कुन्हाल बुऱ्हाण, अरविंद मत्ते, शिवनाथ बुऱ्हाण, विजय नंन्नावरे व समस्त शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.