भरधाव हायवा ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले  

19

एक ठार : एक गंभीर 

कोठारी-गोंडपीपरी मार्गावरील घटना

कोठारी : कोठारी-गोंडपीपरी राष्ट्रीय महामार्गावर सुरजागडकडे भरधाव जाणाऱ्या हायवाने दुचाकीस्वारास कोठारी येथील देवई फाट्याच्या नाल्याजवळ चिरडले  या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना दि.१४ सप्टेंबर शनिवारी सकाळी ८.५० वाजताच्या दरम्यान घडली.

.        कोठारी-गोंडपीपरी राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र लोह खनिजाच्या कच्चा मालाची वाहतूक सुरू आहे. याआधी अनेक अपघात या मार्गावर घडले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला. काहींना अपंगत्व आले. हायवा वाहनाच्या धडकेत अनेकांना यापूर्वी जीव गमवावा लागला. असे असताना सुरजागडच्या हायवाने दुचकीस्वारास चिरडल्याची घटना घडल्याने सुराजगड वाहन अजुन किती बळी घेणार असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.सोबतच अपघात घडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

.        या अपघातात नाना जयराम कुबडे व रामप्रसाद मधुकर भुजनगवार दोन्ही राजुरा येथील इंदिरा नगर वॉर्ड क्र.६ रहिवासी असून दोघेही राजुरा येथून गोंडपीपरी येथे कामानिमित्त दुचाकी क्रमांक एम. एच. ३४ बी. टी.९४१८ या वाहनाने जात असताना कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत देवई फाट्याचे पुलाजवळ सुरजागड येथे लोह खनिज भरण्यासाठी जाणारा भरधाव हायवा क्र. एम.एच.३३ टी.४६५३ ने दुचाकीला धडक दिली. हायवा चालक वाहन निष्काळजी पणाने चालवीत असल्याने त्यावर वाहनवरील नियंत्रण सुटले व दुचाकीस धाक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचे वाहनावरील संतुलन गेले व रस्त्यावर कोसळले असता हायवाचे चाक नाना प्रेमदास कुबडे याच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला व नानाचा जागीच मृत्यू झाला. तर रामप्रसाद गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता. घटनेची माहिती कोठारी पोलिसांना समजताच पोलीस ताफा घटनास्थळावर पोहचवून जखमीस उपचारार्थ कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात रवानगी केली. राजुरा येथे अपघाताची माहिती होताच इंदिरा वॉर्डात शोककळा पसरली आहे.

.        कोठारी स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान यांनी घटनेची नोंद घेत अपघात करणाऱ्या चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला. चालकाने अपघात करून घटनास्थळावरून वाहनसह भरधाव पळून गेला असता त्यास गोंडपीपरी येथे पकडण्यात पोलिसांना यश आले. पुढील तपास कोठारीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान करीत आहेत.

.        दिवसागणिक सुरजागड वाहतूक जीवघेणी ठरत असून नागरिकांच्या जीवावर उठली आहे. यापूर्वी अनेक अपघात झाले असून अनेकांचा जीव जाऊन कुटुंब उध्वस्त झाले आहेत. यावर शासनाने प्रतिबंध करणे अत्यावश्यक झाले आहे, अन्यथा भविष्यात अश्या घटना घडून घराबाहेर निघणाऱ्या व वाहन चालवीणाऱ्या नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होणार आहे. सुरजागड प्रशासन वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी कुठलीही उपाययोजना करीत नाही. मृतक व जखमी परिवाराला कोणतीही आर्थिक मदत करीत नाही. वाहनांचे वेगावर नियंत्रण करण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी सुरक्षा रक्षकांची नाममात्र नियुक्ती केल्याचा देखावा करीत आहे. नेमलेले सुरक्षा रक्षक कुचकामी ठरत असून वाचकांना वेगावर नियंत्रण व सुरक्षित वाहन चालविण्यासाठी कोणतीही कुठेही सूचना करीत नाही. सुरजागड प्रशासनाने मृतक व जखमी असलेल्यांना आर्थिक मदत करून वारसांना नोकरी देण्याचे प्रवधान करावे अशी सर्वस्तरातून मागणी जोर धरत आहे. अपघातानंतर कुणाचा जीव गेल्यानंतर सुरजागड प्रशासनाचे अधिकारी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये दाखल होऊन अधिकाऱ्यांना आपली सफाई देऊन मोकळे होतात मात्र यात सर्वसामान्यांचा जीव जाऊन कुटुंब उध्वस्त होत आहेत. यावर प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.