आ. भांगडियांच्या आर्थिक मदतीने शेतकरी सुखावला

21

शुभम गजभिये

 चिमूर : चिमुर तालुक्यातील बामनगाव येथील  शेतकर्‍यांच्या बैलावर वाघाने हल्ला केला यात बैल जागीच ठार झाला. ऐन हंगामात बैलाचा मृत्यू झालेल्या शेतकर्‍याला आ. किर्तीकुमार भांगडिया यांनी आर्थिक मदत दिल्याने तूर्तास शेतकरी सुखावला.

.         बामनगाव येथील शेतकरी मारोती तुकाराम देवतळे यांचा बैल शेतात चरत असताना अचानक वाघाने हल्ला करून ठार केला. ऐन हंगामात बैलाचा मृत्यू  झाल्याने शेतकर्‍यावर फार मोठे संकट कोसळले. आता शेतीची मशागत कशी करायची. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने, कुटुंबियावर संकट ओढवले असता कुटुंबीयांनी स्थानिक भाजप पदाधिकारी मार्फत चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना आर्थिक मदतीची विनंती केली असता बंटी भांगडिया यांनी त्वरीत भाजपा तालुका अध्यक्ष राजू झाडे यांच्या मार्गदर्शनात भाजपा कार्यकर्ते रमेश कंचर्लावार व भाजपा अ. ज.जा. तालुका आघाडी चे अध्यक्ष तथा सरपंच गजु गुडधे यांचे मार्फत आर्थिक मदत शेतकर्‍याला सुपूर्द केली.