चार पिढीपासून कोहपरे घराण्यात होत आहे जेष्ठ गौरीची घटस्थापना

22

वरोरा : तालुक्यातील सोईट येथील स्व. मारोतराव कोहपरे यांचे घरी चवथ्या पिढीने महालक्ष्मी ची घटस्थापना करून परंपरा सुरु ठेवली आहे.

.        स्व. नारायण कोहपरे यांनी त्यांचा मुलगा स्व. संभाजी यांच्या नवसाच्या महालक्ष्मी घटस्थापनेला सुरुवात केली. त्यानंतर संभाजीने घटस्थापना केली नसल्याने मारोतराव चे वडील लक्ष्मण नी महालक्ष्मीची घटस्थापनेला सुरुवात केली. लक्ष्मण चे मृत्युंनंतर त्यांचा मुलगा स्व. मारोतराव कोहपरे यांनी सुरुवात केली. मारोतराव चे मृत्युंनंतर त्यांची मुले प्रमोद, पद्माकर, प्रदीप, आणि प्रल्हाद कोहपरे चवथ्या पिढीतील चारही बंधूनी महालक्ष्मी व्रत पाळून घटस्थापनेची परंपरा सुरुच ठेवली आहे.

.        महालक्ष्मी चे पितळी मुखवटे इंग्रजाच्या काळात पहिल्या पिढीतील नारायण कोहपरे यांनी तिथक्षेत्र पंढरपूर येथून 300 रुपयात विकत आणले. तालुक्यात पितळी मुखवटे असलेल्या महालक्ष्मीची बंगाईवर उभ्या स्थितीमध्ये घटस्थापना केली जातात. रोषणाईचा झगमगाट,पूजा अर्चा आणि सर्वांना मोहून टाकणाऱ्या महालक्ष्मी म्हणून सोईट गावात एक आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे.

.        मराठी महिला या शुभदिनी व्रत करतात. आणि देवी गौरीची पूजा करतात. व्रत अनुराधा नक्षत्र मध्ये 10 सप्टेंबर ला सुरवात होतात. जेष्ठ गौरी आवाहन हिंदू धर्मात खूप मोठे धार्मिक महत्व आहे. आपल्याकडे गौरी आवाहन पूजन आणि गौरीसह गणपती विसर्जनाची मोठी परंपरा आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाप्रमाणे आवाहन करून महालक्ष्मी च्या प्रतिमा व प्रतिके बसवितात. जेष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मी ची पूजा करतात व महा नैवैद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात. आणि तिची जेष्ठ नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला जेष्ठ गौरी असे म्हणतात. आपल्याकडील संस्कृती परंपरेत गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुले ही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडली जातात. सोन्याच्या पावलांनी येऊन समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्रदान करणाऱ्या गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जनाची मोठी परंपरा आहे.