90 रक्तदात्यांनी रक्तदान करत शेतकरी नेत्याला दिल्या शुभेच्छा 

77

वरोरा : तालुक्यातील आसाळा येथील शेतकरी नेते किशोर डुकरे यांचा 39 वा वाढदिवस. त्यानिमित्याने भटाळा व आसाळा येथील नागरिकांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 90 रक्तदात्यांनी रक्तदान करीत शेतकरी नेत्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या.

.        भटाळा येथील भोलेनाथ गणेश मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तसेच आसाळा येथील त्रिमूर्ती गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. किशोर डुकरे हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तर शेतकर्‍यांच्या विविध मागण्या घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून न्यात मिळवून देण्याचे कार्य करत असल्याने त्यांची ओळख वरोरा तालुक्यात शेतकरी नेते म्हणून केली जाते. दरवर्षी परिसरातील नागरिक आपल्या नेत्याच्या जन्मदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून करतात. बुधवारी झालेल्या भटाळा आणि आसाळा येथील रक्तदान शिबिरात 90 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आसाळा येथील रक्तदात्यांना ट्रॅक सूट चे वाटप करण्यात आले.