चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन 

30

कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीची विकासात्मक वाटचाल

भद्रावती : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवार चंदनखेडा येथे नुकतेच शेतकऱ्यांच्या हितासाठी वे-ब्रिज काटा बसविण्यात आला असून गुरुवारी प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर चे माजी अध्यक्ष  रवींद्र शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.

.       या कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित चंद्रपूर चे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती चे सभापती भास्कर ताजणे तसेच सहउद्घाटक गजानन  उताने बांधकाम सभापती प्रमुख पाहुणे उपसभापती अश्लेषा मंगेश भोयर, संचालक परमेश्वर ताजणे, शरद जांभुळकर, श्यामदेव कापटे,  कान्होबा तिखट, मनोहर आगलावे,  राजेंद्र डोंगे, राजु आसुटकर, शांताबाई रासेकर, चंदनखेडा ग्रामपंचायतचे सरपंच नयन जांभुळे, मुधोली ग्रामपंचायतचे सरपंच बंडू नन्नावरे, अडते मनिष सारडा, व्यापारी महेश घोडमारे, विकास मगरे, किशोर निखार आणि बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर, कर्मचारी विठ्ठल टोंगे, विलास पालकर, राजपाल भागवत, हनुमान मगरे यासोबत परिसरातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

.       याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे म्हणाले, की बाजार समितीचे संचालक मंडळाचे नियमितपणे बाजार समितीच्या कामकाजावर लक्ष ठेवून बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टीने समोर नेण्याचे कार्य करीत असून यांचे संपूर्ण श्रेय बाजार समिती पदाधिकारी व संचालक मंडळ व अधिकारी यांना देण्यात येत आहे. तसेच जिथेपण आवश्यकता असेल तिथे भविष्यात शेतकरी बांधव यांच्या व बाजार समितीच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींची मदत घेऊन विकासाची घोडदौड सुरू ठेवू असे रवींद्र शिंदे म्हणाले. यावेळी बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, की बाजार समितीचे उपबाजार आवार चंदनखेडा परिसरातील शेतकऱ्यांची मुख्य बाजारपेठ असून येथे प्लँटफार्म  व लिलाव शेडची कमतरता जाणवत होती.

.       शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेता सर्व संचालक मंडळ कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. तसेच रविंद्र शिंदे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व विकासात्मक दृष्ट्या मदत घेण्याची सूचना करीत असल्याने आम्हाला विकासात्मक कामाला गती मिळत आहे. याचप्रकारे बाजार समितीचे सर्व संचालक व कर्मचारी वृंद शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करीत राहील. यापुढे सर्व शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल उपबाजार आवार चंदनखेडा येथे विक्रीस आणावा असे आवाहन सभापती यांनी केले.