महावाचन उत्सव अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथप्रदर्शन

16

नागभीड : पंचायत समिती नागभीड शिक्षण विभाग द्वारा कर्मवीर विद्यालय नागभीड येथे  महावाचन  उत्सव अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

.     या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक गटशिक्षणाधिकारी  संजय पालवे, प्रमुख उपस्थिती शि. वि. अ. पं. स. नागभीड सुनिता भंडारे, प्राचार्य कर्मवीर विद्यालय नागभीड देविदास चिलबुले, माजी गटशिक्षणाधिकारी अरविंद चिलबुले, विचारवंत तथा पस्तीस पुस्तकाचे निर्माते साहित्यिक संजय येरणे. स. शि. जि. प. उ. प्राथमिक शाळा नवेगाव हूडेश्वरी, लेखक पराग भानारकर स. शि. सरस्वती ज्ञान मंदिर, आदी पाहुण्याची उपस्थिती लाभली.

.     दैनंदिन जीवनामध्ये पुस्तके किती महत्त्वाची आहेत. जीवनाच्या विकासात पुस्तक हे महत्त्वाचे साधन असून सृजनात्मक विचार अंगी बाळगण्याकरिता वाचन हे महत्त्वाचे आहे. पुस्तकातून मिळालेले ज्ञान चिरकाल टिकणारे व व्यक्तिमत्वाला फुलविणारे असते या विचाराला अनुसरून विद्यार्थी दशेपासून विविध पुस्तके वाचावी. असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले.  मान्यवरांनी पुस्तकांच्या स्टॉलला भेटी देऊन पुस्तकांचे निरीक्षण करीत विद्यार्थ्यांची हितगुज साधले. कार्यक्रमास सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, साधन व्यक्ती, समावेशित तज्ञ, फिरते विशेष शिक्षक, उपस्थित विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ग्रंथालय प्रदर्शनी उत्साहाने पार पडली. प्रास्ताविक सुनिता भंडारे. शि. वि. अ. यांनी केले. संचालन  बाली मडावी, आभार उत्तम बनसोड साधनव्यक्ती यांनी केले.