भरदिवसा पतीने पत्नीची चाकू भोकसून केली हत्या

29

कुडेसावली येथील थरार

कोठारी : पतीने पत्नीवर संशय घेत दोघात कडाक्याचे भांडण झाले. पतीचा राग अनावर झाल्याने त्याने पत्नीवर चाकू भोकसून घराच्या अंगणात हत्या केल्याची घटना दि. १२ सप्टेंला सकाळी 8 वाजताच्या दरम्यान कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत कुडेसावली येथे घडली. रक्ताच्या थारोळ्यात पत्नी अंगणात विव्हळत होती व पती हातात चाकू घेऊन बघणाऱ्यांना जवळ न येण्यासाठी धमकावत होता. या घटनेमुळे गावात व परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास करीत आहेत. वंदना धनपाल रामटेके असे मृतकाचे नाव असून आरोपी धनपाल माधव रामटेके यास पोलिसांनी अटक केली आहे.

.      धनपाल रामटेके मागील अनेक दिवसांपासून गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता. तो स्वभावाने तापट होता. त्याचे पत्नी व मुलांसोबत पटत नव्हते.मोठा मुलगा बाहेरगावी राहत होता तर लहान मुलगा त्याच्याजवळ राहत होता. धनपाल चें पत्नीसोबत कोणत्या- ना कोणत्या कारणाने नेहमी खटके उडत होते. गुरुवारला सकाळी पती धनपाल व पत्नी वंदना यांच्यात संशयावरून वाद झाला. धनपालने घरातील चाकू आणून पत्नी वंदना हिच्यावर सपासप वार केले. वंदना घराच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडली होती. शेजाऱ्यांनी घरासमोर जाऊन वंदनाला पाणी पाजण्यासाठी व उपचारासाठी नेण्यासाठी गेले. मात्र धनपालने हातात चाकू घेऊन वंदनाच्या सभोवताल फिरून कुणीही तिला न्यायचे नाही अन्यथा तुम्हालाही मारणार असे धमकावत होता. सदर घटनेची माहिती कोठारी पोलिसांना गावकऱ्यांनी भ्रमणध्वनीने दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळ गाठून धनपाल यास ताब्यात घेतले व वंदना हिला उपचारासाठी कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले परंतु डॉक्टर हजर नसल्याने तिला बल्लारपूर येथे उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच वंदनाचा मृत्यू झाला.

.      धनपाल रामटेके याचा मुलाला सदर माहिती होताच त्याने कोठारी पोलिसात तक्रार दिली. कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश खरसान पुढील तपास करीत आहेत.