अतिक्रमण मोहिमेत राजकीय पक्षांना जाणिवपुर्वक सुट दिली जाते का ?  – खासदार धानोरकर

15

घुग्घुस अतिक्रमण जमीन प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न

चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु असून काही राजकीय पक्षांना जाणिवपुर्वक सुट दिली जाते का ? असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून घुग्घुस येथील सर्व्हे क्र. 17 मधील राजकीय पक्षाद्वारे अतिक्रमीत केलेल्या जमिनीवरुन केला आहे.

.       चंद्रपूर शहर तसेच घुग्घुस शहरात देखील प्रशासनाद्वारे न्यायालयाचा दाखला देत अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु आहे. यामध्ये सामान्य नागरीकांचे अतिक्रमण सरसकट काढत आहेत. परंतु, घुग्घुस येथील सर्व्हे क्र. 17 मधे एका राजकीय पक्षाचे सेवा केंद्र सुरु असून त्याला शासनाचे अभय का? खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. सदर जागेची मागणी एका राजकीय पक्षाशी संबंध असलेल्या व शिक्षकी पेशा असून शाळेत न जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेने सदर जागेची मागणी केली. या जागेचा नोटीस 08 ऑगस्ट रोजी प्रसिध्द झाला असतांना तो जाणीवपुर्वक नोटीस बोर्डाच्या दर्शनीय भागात लावण्यात आला नाही. दि. 02 सप्टेंबर रोजी आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख असतांना 31 ऑगस्ट व 01 सप्टेंबर रोजी सुट्टीचे औचित्य साधून कोणीही आक्षेप घेऊ नये यासाठी 30 ऑगस्ट रोजी लावण्यात आला.

.       सदर बाब जाणीपूर्वक केली का? असा प्रश्न खासदार धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे सामान्य नागरिकांना जागा मिळत नसत नसुन दुसरीकडे एखाद्या संस्थेला 0.43 हे.आर. जागा भाडेपट्ट्याने देणे हा कुठला न्याय? असा प्रश्न देखील खासदार धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ अतिक्रमण काढून वरील प्रकरणात दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग हाती घ्यावा लागेल असा ईशारा देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.