गावठी बंदूक बाळगणाऱ्या तरुणाला अटक

24

कवडजई येथील प्रकार

कोठारी : कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या  मौजा कवडजई येथील एका तरुणाकडे गावठी बंदूक, काडतुसे व भाला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सोमवारी तरुणाला ताब्यात घेत त्याचे कडून गावठी बंदूक, काडतुसे व भाला जप्त करण्यात आला.

.      प्राप्त माहिती नुसार कवडजई येथील रोशन ढोंगे यास विश्वासात घेऊन त्याच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या चौकशी व विचारपूस केल्यानंतर रोशन ढोंगे याने बंदूक व काडतुसे शेतात खड्डा करून ठेवल्याची कबुली दिली. कवडजई येथील शेतीत रोशनला घेऊन पोलीस पोहचले. त्याने मोकास्थळ दाखविले.त्यावर खोदले असता स्टीलचे डब्ब्यात बंदूक व चार काडतुसे आढळून आले.त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात अली असता घरन लोखंडी भाला पोलिसांनी ताब्यात घेतला.रोशन ढोंगे याचे विरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,४,२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ नुसार कारवाई करून अटक करण्यात आली.

.    सदर कारवाई ठाणेदार योगेश खरसान यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार सचिन पोहनकर, जावेद सिद्दीकी, साईनाथ उपरे, मपोअ जयश्री गुरनुले यांनी केली. आरोपीस बल्लारपूर न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली.पुढील तपास ठाणेदार योगेश खरसान करीत आहेत.