शेकडो महिलांचे लाडक्या बहिणीच्या ऑनलाइन झालेले अर्ज अजूनही पेंडींगच

18

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मंजुरीसाठी करावी लागणार ऑक्टोंबर महिन्याची प्रतीक्षा ?

पंकज रणदिवे

   नेरी : शासनाने महिलांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवित असते याच प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. सुरुवातीला ऑनलाईन झालेल्या अर्जना 4-5 दिवसांत मंजुरी मिळत होती. व शासनाने पैसे पाठविताच आधार लिंक खात्यात सरळ पैसे जमा होत आहे.

.       या योजनेची दुसरी किस्त व ज्यांनी नव्याने अर्ज केले त्यांना 3 महिन्यांचे मिळून असे 4500 रुपये दिनाक 10 सप्टेंबर पासून टाकण्यात येणार असल्याची माहिती विविध प्रसरमध्यामातून जनतेला मिळाली. मात्र असे असतानाही ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्या पासून चिमूर तालुक्यात ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेल्या शेकडो अर्ज अजूनही तालुका कार्यालयाने मंजुरी न दिल्याने त्यांना या 10 तारखेला लाभ मिळण्याची शक्यता धूसर होत चाललेली आहे. याला कर्मचारी दोषी असून अश्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून आर्जांजुर करणे गरजेचे झाले आहे.

.        शासनाने एकीकडे जोमाने योजेनाला सुरुवात केली. एकीकडे लाखो महिलांना 3000 रुपये मिळाले. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहेच. मात्र दुसरीकडे 25-30 दिवसांचा कालावधी होऊनही ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज मंजूर झालेले नसल्याने व अर्ज ऑनलाईन पोर्टलवर अजूनही pending स्थितीती दिसत असल्याने महिलांना हिरमोळ होत आहे. तेव्हा या बाबीची दाखल घेऊन चिमूर तालुक्यातील कार्यालयाने लाडक्या बहिणीनचे pending असलेले अर्ज तत्काळ मंजूर करावे अशी मागणी महिलांनी केलेली आहे.

सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे सुधा झाले बंद                                                                                                                                                                                                दिनांक 06 सप्टेंबर पूर्वी कोणत्याही सेतू सुविधा केंद्रातून लाडक्या बहिण योजेनासाठी निःशुल्क भरणा केंद्र सुरू होते. त्यामुळे महिलांना सोयीचे ठरत होते. महिला मंजुरी करून वेळ मिळेल तेव्हा online केंद्रात जाऊन अर्ज करत होत्या. मात्र दिनांक 6 सप्टेंबर पासून सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाइन होणारी अर्ज प्रक्रिया सुद्धा बंद झालेली असल्याचे दिसत असून नवीन अर्जासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क कारा असा संदेश दाखवत आहे. त्यामुळे महिलांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तेव्हा शासनाने लाडक्या बहिनेचे ऑनलाइन पोर्टल पूर्ववत सुरू करावे अशी मागणीही महिलांनी केलेली आहे.