आज सिंदेवाहीत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पूर्व ची बैठक आयोजित

26

सिंदेवाही : धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा. आणि धम्माची चळवळ गतिमान व्हावी. या उदात्त हेतूने मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा सिंदेवाही येथील कार्यकारिणी गठीत करण्यासंदर्भात रविवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी भंते शोभित मैत्रेय बुद्ध विहार पोलीस स्टेशन समोर सिंदेवाही येथे दुपारी १२ वाजता भारतीय बौध्द महासभा जिल्हा पूर्व ची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

.        भारतीय बौध्द महासभा चंद्रपूर जिल्हा पुर्वचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे यांचे नेतृत्वात मागील अनेक वर्षापासून धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी गावागावात भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा तयार करण्यात येत असून त्या अनुषंगाने तालुका शाखा सिन्देवाहीची कार्यकारिणी गठीत करण्यात येत आहे. तरी तालुक्यातील संपूर्ण बौद्ध उपासक उपाशिका तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी ग्राम पदाधिकारी बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, सर्व सैनिक संस्थेचे हितचिंतक यांनी दिनांक ८ सप्टेंबर ला ठीक १२ वाजता भंन्ते शोंभित मैत्री विहार पोलिस स्टेशन समोर सिन्देवाही येथे आपण उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौध्दमाहासभा तालुका शाखा सिन्देवाही चे सरचिटणीस प्रा. जगदीश सेमस्कर व भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व चे अध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे कडून करण्यात येत आहे.