कोरोना काळात बंद झालेली वडसा-चांदाफोर्ड, चांदाफोर्ड-गोंदिया रेल्वे पुर्ववत सुरू

16

खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांना यश

खा. किरसान यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ट्रेन होणार रवाना

नागभीड : कोरोना महामारी मुळे बल्लारशहा – गोंदिया रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्या बंद करण्यात आल्या. कोरोना जाऊन काळ लोटला असला तरी बऱ्याच रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या नसल्याने अनेक प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. त्यामध्ये वडसा – चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया रेल्वेगाडीचा समावेश होता, वारंवार मागणी करून देखील बंद रेल्वे पूर्ववत सुरु करण्यात आली नसल्याने.

.        या संदर्भात गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात वडसा-चांदाफोर्ड, चांदाफोर्ड-गोंदिया रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली. अखेर खासदार डॉ. किरसान यांच्या प्रयत्नाना यश आले असून कोरोना काळात बंद झालेली वडसा-चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया ही रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सदर रेल्वे 8 सप्टेंबर पासून नियोजीत वेळेवर धावणार असून यामुळे सदर मार्गांवर प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवास्यांना सोयीचे होणार आहे. 8 सप्टेंबर रोजी, वडसा रेल्वे स्थानकावर सकाळी 7.15 मिनिटांनी खासदार डॉ. नामदेव किरसान सदर रेल्वे ला हिरवी झेंडी दाखविणार आहेत.