ढोल-ताशांच्या गजरात बाप्पा झाले विराजमान

30

घरगुती गणेशासह सार्वजनिक मंडळांनी केले बाप्पांचे जंगी स्वागत

चंद्रपूर : शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणेशोत्सव सणाला सुरुवात होत आहे. याकरिता बाप्पांचे आगमन एक दिवस अगोदरच होत असते. चंद्रपूरमध्ये दि. 7 सप्टेंबर रोजी शनिवारी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे आगमन झाले. ढोल ताशांचा गजर, बैंड, भजन, चंद्रपूरच्या जगदंबा ढोलच्या तालावर बाप्पांचे स्वागत करण्यात आले.

.        दाताळा, वडगाव, बाबुपेठ, घुग्घुस, ताडाळी, दुर्गापूर तसेच चंद्रपूर ग्रामीण भागात बाप्पांचे आगमन झाले. शहरात गेल्या दहा-बारा दिवसांपासून बाप्पांच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरू होती. आज बाप्पांचे आगमन होणार असल्याने भक्त सकाळपासून तयारीला लागले. शनिवारी सायंकाळी चंद्रपूर तसेच आजूबाजूच्या परिसरातील सार्वजनिक तसेच काही घरगुती बाप्पांचे आगमन बोल-ताशांच्या गजरात झाले.

पालकमंत्री ना.  सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले.
पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी विराजमान झाले बाप्पा

वाहनांची सजावट : बाप्पांच्या आगमनासाठी वाहना सजावट करण्यात आली. शहरातील अनेक भागात गणेशमूर्ती केंद्रात विक्रीला ठेवण्यात आल्या आहे. मात्र बहुतांशी मंडळांनी कारखान्यातून मूर्ती खरेदीस प्राधान्य दिले. घरगुती मूर्ती खरेदी करणारांनी जवळच्या स्टॉलवरच मूर्ती खरेदी केली तर काहींनी परंपरागत कला केंद्रातून मूर्ती खरेदी केल्या. गणपतीच्या आरती, स्तोत्र आि मंत्रपठणाने वातावरण मंगलम बनले आहे. अनेकाना मूर्ती खरेदी करताना सेल्फीचा मोह आवरता आला नाही. कालानुरूप बदल झालेल्या गणेशमूर्ती कला केंद्रात नजरेस पडत आहेत.