नंदोरीत तान्हा पोळा उत्साहात साजरा

43

चिमुकल्या शेतकऱ्यांना मिळाले आकर्षक बक्षिसे 

चंद्रपूर : तान्हा पोळा हा बालगोपाळांचा जिव्हाळ्याचा सण आहे. नंदोरी येथील लहान हनुमान मंदिर परिसरात तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध तर्हेच्या वेशभूषा करून मुलांद्वारे सामाजिक संदेश दिले गेले. दीड दोन वर्ष्यांच्या मुलांसह 10 ते 11 वर्षांची मुलांनीही आपले सजवलेले नंदी घेऊन एकत्रित येत हा सण साजरा केला.

.       लहान हनुमान मंदिर देवस्थान नंदोरी च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तान्हा पोळा ला भटाळी ग्रामपंचायत चे सरपंच सुधाकर रोहणकर यांच्या हस्ते प्रथम बक्षीस म्हणून सायकल देण्यात आली. तर गावातील अनेक नागरिकांनी इतर बक्षिसे दिली. या पोळ्यातील मुख्य बक्षिसे हनुमान देवस्थानच्या वतीने देण्यात आली. या तान्हा पोळ्यात  आकर्षक नंदी, वेशेभूषा, उत्तम संदेश देणाऱ्या मुलांना बक्षिसे देण्यात आली. हे बक्षीस मिळविण्यासाठी मुलांसह पालक देखील मुलांच्या आणि त्यांच्या लाकडी नंदीच्या सजावटीच्या तयारीला लागले होते.  सर्वांपेक्षा माझा नदी कसा वेगळा दिसेल यासाठी प्रत्येकजण प्रयत्नरत होते. कोणी शेतकरी, तर कोणी मराठमोडी लुगडं परधान करून सजूनआले होते. आता हा तान्हा पोळा सामाजिक संदेश देणारे स्थान झाले आहे. झाडे लावा, बेटी बचाव, सृष्टी स्वच्छ ठेवा, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण बचाव असे विविध संदेश घेऊन या तान्हा पोळ्यात बच्चेकंपनी उभे होते. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग व गावकरी उपस्थित होते.

.       परीक्षकांच्या माध्यमातून उत्कृष्ट, नंदी, वेशभूषा, स्लोगन यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक दिले गेले. तर इतर मुलांना चॉकलेट, बिस्कीट, शालेय संच आणि बोजारा म्हणून 10 रुपये देण्यात आले.यावेळी नंदोरी ग्रामपंचायत चे सरपंच मंगेश भोयर, हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष तुळशीदास लांबट, उपाध्यक्ष विवेक एकरे, सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य किशोर उमरे, माजी सभापती धनराज विरुटकर, उपसरपंच उषा लांबट, ग्रामपंचायत सदस्य शरद खामणकर, माजी उपसरपंच भानूदास ढवस, विनोद लांबट, कार्तिक कामडे, महादेव भडगरे, पांडुरंग लांबट, सुनील कामडे, सतिष लांबट, विकास लांबट,  प्रविन लांबट, रवी खाडे, राहुल भडगरे,  गुरुदेव हरणे, आशिष एकरे, अमोल पिंपळकर, अक्षय हरणे, अमोल परचाके, रितेश हरणे, दिपक अहिरकर, प्रशांत अहिरकर, उद्धव बलकी, सुरेश विरुटकर, अनिल ढवस,  ऋषिकेश हरणे, अनिकेत हरणे, हिमांशु ताजणे, सचिन लांबट, गौरव निखाडे सह मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.