वरोर्‍यात उत्कृष्ट नंदीबैल सजावट स्पर्धा संपन्न

53

प्रथम श्रीरक्ष उगे तर द्वितीय रुद्राक्ष क्षीरसागर यांनी पटकाविले

वरोरा : ताना पोळा उत्सव समिती व 24 तास सेवा ग्रुप समितीच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन चौक वरोरा येथे उत्कृष्ट नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक रश उगे या बालकाने पटकाविला.

.       यावेळी उद्धाघटक म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून  माजी नगराध्यक्ष विलास टिपले, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, माजी नगरपरिषद सभापती छोटू शेख, अस्थिरोग तज्ञ डॉ. सागर वझे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण काकडे, शुभम चिमूरकर, दिपाली माटे, डॉ. काजल धोटे, सुनील कटारिया व आदीउपस्थित होते.

.       नंदीबैल सजावट स्पर्धेत द्वितीय क्रमांक रुद्राक्ष क्षीरसागर, तृतीय संदेश कुकरेजा, चतुर्थ अध्याय शेंडे, पाचव रिदम चौधरी यांनी पटकाविले. सर्पमित्र बाळू जीवने, हिमालय मडावी, अनिकेत मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.

.       कार्यक्रमाचे संचालन आरती रोडे व गुरुदेव जुमडे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण राजेंद्र मर्दाने, हरीश ढोबळे, उज्वला खिरटकर, रेखा झाडे, भारतीय लखमापूरे, साबीया खान यांनी केले. कार्यक्रमाला लखन केशवानी, सखाराम पाऊलकर, दत्तश्री ठाकरे, पद्माकर झोडापे, शशिकांत ठाकरे, सुरज केशवानी, प्रफुल वनकर, लेकु केशवानी, सुरज मेश्राम, श्रेयश कुंबरे, अक्षय शिरसागर, दीपक केशवानी, अमित घोडमारे, मनोज गुप्ता आदींनी सहकार्य केले.